21 पक्ष्यांचा अचानक पिंपरी चिंचवड शहरात मृत्यू

Eagle
Eagle

कावळे, चिमण्या, कबुतरे, पारवे, वटवाघुळांचा समावेश
पिंपरी - राज्याचा पशुसंवर्धन विभाग "बर्ड फ्ल्यू'चा धोका नसल्याचे सांगत असला तरी, शहर परिसरात 21 हून अधिक कावळे, चिमण्या, कबुतरे, पारवे, वटवाघूळ आदी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिक घाबरले असून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, अनेक तर्क लावले जात आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पक्ष्यांचा हा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला हे अद्याप जिल्हा पशुसंवर्धन विभागांकडून स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे स्थानिक पशुपालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यापासून अनेक परिसरात एकेक पक्ष्याचा मृत्यू होत आहे. यात कावळे, चिमणी, कबुतरे, पारवा, वटवाघूळ यांचा समावेश आहे. संख्या कमी असली, तरी मृत्यू होत असल्याबाबत चिंचवडगाव, भोसरी, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण, निगडी, मोशी, इंद्रायणीनगर अशा परिसरातून पशुवैद्यकीय विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे व डॉ. घनश्‍याम पवार विविध परिसरांना भेट देवून या प्रकाराची माहिती घेत आहे. मृत्यू कशामुळे झाला हे वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.

दोन पारव्यांना कांजिण्या
माणसांप्रमाणेच पक्ष्यांनादेखील व्हायरल आजार होत आहेत. दोन पारव्यांना कांजण्यांची लागण झाली असून त्यांच्यावर महापालिकेच्या बहिणाबाई प्राणी संग्रहालयात उपचार सुरू आहेत.

मांजामुळे चार घारी व पारव्यांचा मृत्यू
- संक्रांत सणाला पतंग खेळतात. पतंगाच्या नायलॉन माज्यांचे अनेक पक्षी बळी ठरताहेत. शहरातील चार घारींच्या पंखांना इजा झाली आहे. एकीच्या पायाला गंभीर जखम झाल्यामुळे ती पूर्ववत उडू शकणार नाही. दोघ पक्ष्यांचे पंख तुटले आहेत.

अचानक मृत्यू झालेले पक्षी
-पक्षी - संख्या
-कबुतरे -11
-कावळे - 4
-पारवे -4
-चिमणी - 1
-वटवाघुळ -1

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com