तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उचललं मोठं पाऊल; चिखलीतील धक्कादायक घटना 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणीने पेस्ट कंट्रोलचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना चिखलीतील पाटीलनगर येथे घडली.

पिंपरी : तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणीने पेस्ट कंट्रोलचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना चिखलीतील पाटीलनगर येथे घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. 

चोरट्यांचा उच्छाद; चिखलीत भरदिवसा साडेतेरा लाखांचा ऐवज लंपास

आकांक्षा ज्ञानेश्‍वर पाटील (वय 23, रा. वेदांत अपार्टमेंट, पाटीलनगर, चिखली) असे तरुणीचे नाव आहे. सर्फराज युनुस पटवेकर (वय 35, रा. पीसीएमसी स्कूलसमोर, काळभोरनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आकांक्षा व सर्फराज हे आकुर्डीतील एका शोरूममध्ये एकत्र काम करीत होते. सर्फराज त्यांना वारंवार मानसिक त्रास देत धमकी द्यायचा. त्याने आकांक्षा यांच्याकडून अनेकदा पैसेही घेतले होते. ते पैसेही परत दिले नाहीत. त्यांना वेळोवेळी त्रास देऊन त्यांचे जगणे असह्य केल्याने या त्रासाला कंटाळून आकांक्षा यांनी 15 सप्टेंबरला राहत्या घरी पेस्ट कंट्रोलचे औषध प्राशन केले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आकांक्षा यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठही लिहून ठेवली आहे.
दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पटवेकर याला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide of a young woman after drinking pesticide in chikhali

Tags
टॉपिकस