esakal | राज्यस्तरीय हिंदी कवी संमेलनात प्रा. सुनीता पठारे प्रथम
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय हिंदी कवी संमेलनात प्रा. सुनीता पठारे प्रथम

- राज्यातील ३७ कवींचा सहभाग

राज्यस्तरीय हिंदी कवी संमेलनात प्रा. सुनीता पठारे प्रथम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या पुणे विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी अध्यापकांच्या ऑनलाइन कवी संमेलनात ३७ कवींनी सहभाग घेतला. शंभरहून अधिक श्रोत्यांनी या काव्यरसाचा आनंद घेतला. संमेलनात प्रा. सुनीता पठारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कवी संमेलनाचे ऑनलाइन उद्धाटन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे हिंदी विभागाचे वरिष्ठ व्याख्याते डॉ. विजयकुमार रोडे यांनी दीपप्रज्वलन करून केले. पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा. बाळासाहेब शेटे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. पुणे विभाग अध्यक्ष प्रा. संजय पवार यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले, की कोरोनाची पार्श्वभूमी असतांनाही अशाप्रकारे कवी संमेलनाचे आयोजन म्हणजे बहुदा पहिलाच प्रयत्न असावा, पण अशी गरज होती. तसेच संघामध्ये चैतन्य निर्माण व्हावे व कवींना मंच उपलब्ध करून द्यावा, यासाठी संघाची ही जबाबदारी पुणे विभागाने घेतली व राज्यातील कवींनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

प्रा. रामदास मुंगसे यांनी कवी संमेलनाचे निर्णायक कनकवली येथील प्रा. संजय गांवकर यांचा परिचय करुन दिला. कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून संघाचे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद कांबळे होते. सूत्रसंचालन प्रा. चारुता दाभोळकर व प्रा. मच्छिंद्र भिसे यांनी केले. प्रा. डॉ. बबीता राजपूत यांनी आभार मानले.

कवी संमेलनातील विजेते

प्रथम क्रमांक- प्रा. सुनीता पठारे, विश्वकर्मा कॉलेज, कोंढवा पुणे. द्वितीय क्रमांक- प्रा. अरुण आहेर, नवभारत ज्यु. कॉलेज, जालना. तृतीय क्रमांक- प्रा. सुषमा चौगुले, डी. डी. शिंदे सरकार, ज्यु. कॉलेज, कोल्हापूर.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑनलाइन कवी संमेलनात औरंगाबाद येथून डॉ. राजकुमार कांबळे, लातूर येथून प्रा. राजेसाब मौजन, अमरावती येथून प्रा. हसन शेख, नाशिक येथून प्रा. सुदाम पाटील, मुंबईहून प्रा. वंदना पावसकर, नागपूर येथून प्रा. विनोद डोमकावळे, कोल्हापूर येथून प्रा. नंदा गायकवाड, तसेच राज्य सचिव प्रा. रेवननाथ कर्डिले, राज्य कार्याध्यक्ष प्रा. सुंदर लोंढे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. सुनिल भोसले इ. मान्यवर ऑनलाइन उपस्थित होते.