esakal | लग्नाच्या आमिषाने तरुणीला पळवून नेऊन खून केल्याचा वडिलांचा संशय

बोलून बातमी शोधा

Suspected of kidnapping and murder in the lure of marriage

उर्मिला ही दापोडी सीएमईमध्ये राहत होती. त्यावेळी आरोपी अरविंद याने उर्मिलाला लग्नाचे आमिष दाखवून तिला उत्तरप्रदेशात पळवून नेले. पळवून नेल्यानंतर आरोपींनी उर्मिला हिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी अथवा तिला कोणत्यातरी व्यक्तीला विकले असा संशय फिर्यादी यांना आहे.

लग्नाच्या आमिषाने तरुणीला पळवून नेऊन खून केल्याचा वडिलांचा संशय
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : लग्नाच्या आमिषाने तरुणीला दापोडी येथून उत्तर प्रदेशला पळवून नेले. त्यानंतर तिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली किंवा तिला विकले असल्याचा संशय तरुणीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अपहरण, खून, पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद बरार (वय ३०), मनीष (वय २५), ठकुरी (वय ५५, तिघे रा. मुसमरिया, जि. जालौन, उत्तरप्रदेश), साधना, कनछीदना (दोघी रा. सीएमई, दापोडी, मुळ - क्योलारी, जि. जालौन, उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सहाबसिंह पंचमसिंह बरार (वय ४७, रा. मडोरा, जि. झांसी, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. उर्मिला सहाबसिंह बरार (वय १८) असे पळवून नेलेल्या तरुणीचे नाव आहे.

पुण्याला केंद्राकडून मिळाले निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर; अधिकाऱ्याची तक्रार

उर्मिला ही दापोडी सीएमईमध्ये राहत होती. त्यावेळी आरोपी अरविंद याने उर्मिलाला लग्नाचे आमिष दाखवून तिला उत्तरप्रदेशात पळवून नेले. पळवून नेल्यानंतर आरोपींनी उर्मिला हिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी अथवा तिला कोणत्यातरी व्यक्तीला विकले असा संशय फिर्यादी यांना आहे. याबाबत त्यांनी उत्तरप्रदेशातील चुर्खी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे घडल्याने हा गुन्हा भोसरी पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

कौतुकास्पद! महाराष्ट्रात सर्वप्रथम 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार