आकुर्डीतील 'त्या' 8 कुत्र्यांचा मृत्यू नेमका कसा झाला...

dogs.jpg
dogs.jpg

पिंपरी : आकुर्डी परिसरातील विविध परिसरात 7 ते 8 कुत्री मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना संशयास्पद असून या मुक्‍या प्राण्यांचा आकस्मित मृत्यू नेमका कशाने झाला आहे, याची चौकशी होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कुत्र्यांचे शासकीय पशू रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी जावेद शेख यांनी पशुवैद्यकीय विभागाकडे केली आहे. दरम्यान, लॉकडाउनमध्ये भूकबळीने कुत्र्यांचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

नगरसेवक जावेद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ""मागील चार पाच दिवसांपासून आकुर्डीतील दत्तवाडी- विठ्ठलवाडी येथे 7 ते 8 भटक्‍या कुत्र्यांचा आकस्मित मृत्यू झाला आहे. क्रांतीनगर, एकता नगर, दत्तवाडी, भाजी मंडई, विवेकनगर या परिसरातून नागरीकांनी "आमच्या येथे कुत्रा मरून पडला आहे, उचलून घ्या,' असे सांगण्यात आले. त्यानंतर काही दिवसांच्या आतच आणखी 7 कुत्र्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी एकूण 8 कुत्र्यांचा मृत्यूमुळे आकुर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे, नागरीकांनी या मृत्यूचे गूढ उलगडत नसल्याने लोकप्रतिनिधींनी या मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. सोसायटीच्या परिसरात सतत भुंकत तसेच घाण करीत असल्याने सोसायटीमधील कोणीतरी व्यक्तीने अन्न पदार्थांमध्ये विषारी औषध घालून त्यांना मारले असल्याची शक्‍यता, तर काही नागरिकांनी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे की काय अशी शक्‍यता व्यक्त केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"शासकीय पशूरूग्णालयातच पोस्टमार्टेम करण्याची सुविधा आहे. लोकप्रतिनिधींनी पोलिस तक्रार केल्यावरच कुत्र्यांचे शवविच्छेदन होऊ शकेल, त्यावरूनच नेमके कारण समजू शकेल. भूकबळीने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.'' 
-डॉ. अरूण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com