पिंपरी: तडीपार आरोपीची पोलिसाला जीवे मारण्याची धमकी

‘मला सोड नाहीतर तुला जिवे मारीन’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा घालण्याचा प्रयत्न
पिंपरी
पिंपरीsakal

पिंपरी : शहरातून तडीपार केले असतानाही हद्दीत आलेल्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याशी आरोपीने हुज्जत घातली. ‘मला सोड नाहीतर तुला जिवे मारीन’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना दापोडी गाव येथे घडली.

स्वप्नील उर्फ सपन्या सुरेश भोई (वय १९, रा. वॊर्ड क्रमांक ३, दापोडी) असे अटक केलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई आशिष मल्लेश गोपी यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी भोई याला २२ जानेवारी २०२१ ला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला.

पिंपरी
पुणे : टोळक्याकडून व्यावसायिकावर कोयत्याने वार

याबाबत भोसरी पोलिसांना माहिती मिळताच भोसरी ठाण्यात कार्यरत असलेले फिर्यादी गोपी हे बुधवारी (ता. १८) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास दापोडी गावातील स्मशान भूमीजवळ आरोपीला पकडण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्याशी झटापट केली. ‘मला सोड, नाहीतर तुला जीवे मारीन’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com