Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीसांनी एका इसमावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली.
crime
crimeesakal

तळेगाव स्टेशन - अल्पवयीन मुलीला गच्चीवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीसांनी एका इसमावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

तळेगाव स्टेशन येथील वतननगरमधील एका रहीवासी सोसायटीच्या इमारतीत शनिवारी (ता. ०९) रात्री ही घटना घडली. पिडीत अल्पवयीन मुलगी इमारतीच्या आवारात खेळत असताना 'तुमच्या बिल्डींगचे टेरेस कुठे आहे? मला दाखव' असे बोलुन तिला आरोपीने गच्चीवर नेले. तिच्या अंतर्वस्त्रात हात घालून, गुप्तागांवरून हात फिरवत अश्लिल चाळे केले.

घडल्या प्रकारानंतर पिडीत मुलीने रडत रडत घरी जाऊन आपल्या आईला झालेला प्रकार सांगीतला. झाल्या प्रकाराबाबत पिडीत मुलीचे वडिल आरोपीच्या घरी विचारायला गेले असता, आरोपी लादी पुसायची काठी घेवून त्यांच्या अंगावर धावुन आला. काठीने डोक्यात मारुन तुला बघुन घेतो, अशी पिडीत मुलीच्या वडिलांना धमकी दिली.

मुलीच्या वडिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गणेश रमेश देवडे (३३, कृष्ण नगरी, वतननगर, तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे) याला पोलिसांनी रविवारी (ता. १०) अटक केली आहे. सोमवारी (ता. ११) आरोपीस न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहीती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर वाघ यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com