...म्हणून पिंपरीतील शिक्षकांनी केले आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या प्रलंबित मागण्या व त्याच्या पूर्ततेसाठी शिक्षक दिनीच पिंपरी-चिंचवड कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे आकुर्डीतील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. 

पिंपरी : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या प्रलंबित मागण्या व त्याच्या पूर्ततेसाठी शिक्षक दिनीच पिंपरी-चिंचवड कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे आकुर्डीतील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. 
पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे समन्वयक व प्राचार्य विक्रम काळे म्हणाले, ""मूल्यांकन पात्र घोषित व अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे. केवळ घोषित यादीचा विचार न करता अघोषित यादीतील शिक्षकांना देखील हे वेतन अनुदान द्यावे. दोन दशकाहून अधिक काळ 2002-2003 पासून वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना देखील पद मंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माहिती तंत्रज्ञान (आय टी) विषय शिक्षक गेल्या दहा ते वीस वर्षांहून अधिक काळ अत्यल्प वेतनावर कार्यरत आहेत, अशा शिक्षकांना वेतनश्रेणीत वेतन देण्यात यावे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सरकारी कर्मचाऱ्यांना 10-20-30 वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्‍वासित प्रगती योजना लागू करावी. या मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवडच्या शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

यासाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे कार्यकारिणी सदस्य प्रा. गोपीचंद करंडे, प्रा. नामदेव भोर, प्रा. अनिल गुंजाळ, माहिती व तंत्रज्ञान विषयाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. श्रीकांत आचोले, प्रा. राजू हजारे, प्रा. संजय पाटील, प्रा. विनायक थोरात, प्रा. श्‍यामसुंदर गवळी, प्रा. लक्ष्मण जगदाळे, प्रा. राहुल मोरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers' agitation in Pimpri