आकुर्डीत भरदिवसा २ लाखांची घरफोडी; कडीकोयंडा कापून चोरटे शिरले घरात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

दरवाजाचा कडीकोयंडा कापून घरात शिरलेल्या चोरट्याने दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना भरदिवसा आकुर्डी येथे घडली. जयवुन युसूफ सय्यद (वय 65, रा. गणेशनगरी, सी विंग, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर बंद असताना चोरट्याने सकाळी दहा ते सायंकाळी पावणे पाच या वेळेत दरवाजाचा कडीकोयंडा कापून घरात शिरला.

पिंपरी - दरवाजाचा कडीकोयंडा कापून घरात शिरलेल्या चोरट्याने दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना भरदिवसा आकुर्डी येथे घडली.

 लोणावळ्यात पर्यटकांची विकेंडला फुल्ल गर्दी!

जयवुन युसूफ सय्यद (वय 65, रा. गणेशनगरी, सी विंग, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर बंद असताना चोरट्याने सकाळी दहा ते सायंकाळी पावणे पाच या वेळेत दरवाजाचा कडीकोयंडा कापून घरात शिरला. किचन रूममधील लॉक न केलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली सोनसाखळी, कर्णफुले, अंगठी, सुटे मणी हे सोन्याचे दागिने व पाच हजारांची रोकड असा एकूण दोन लाख एक हजारांचा ऐवज लंपास केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही घटना सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासह आजूबाजूंच्या नागरिकांकडून माहिती घेत आरोपींचा शोध सुरू आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft in akurdi crime

Tags
टॉपिकस
Topic Tags: