धक्कादायक! पिंपरीगावात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू  

Three members of the same family die in Pimpri-Chinchwad due to corona
Three members of the same family die in Pimpri-Chinchwad due to corona
Updated on

पिंपरी : पिंपरी वाघेरे गावातील सामाजिक, कुस्तीगीर, कामगार क्षेत्रातील प्रसिध्द कलापुरे परिवारातील तीन सख्ख्या भावांचा नऊ दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्देवी  घटनेमुळे पिंपरीगावात शोककळा पसरली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकाच रुग्णालयात उपचार घेत असलेले वस्ताद पोपटराव कलापुरे (वय 66), पैलवान ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली कलापुरे (वय 63) आणि पैलवान दिलीपराव कलापुरे (वय 61, सर्व रा. पिंपरीगाव) असे या तीन सख्ख्या भावंडांची नावे आहेत. सामाजिक व कुस्तीगीर क्षेत्रात, तसेच कामगार चळवळीत या कुटूंबाचे खूप मोठे योगदान आहे. पोपटराव कलापुरे हे महापालिकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते.  त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामगार पथसंस्थेचे अध्यक्षपदही भूषविले होते. तर ज्ञानेश्‍वर कलापुरे हे हिंदुस्थान ऍण्टीबोटिक्‍स कंपनीतून निवृत्त झाले होते. ते पैलवान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. तर तिसरे बंधू केएसबी पंप्स या कंपनीतून निवृत्त झाले होते. ते देखील पैलवान म्हणून प्रसिद्ध होते. यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

इंधन दरवाढीचा वेग सुसाट; पेट्रोल स्थिर, डिझेलची मात्र दरवाढ मात्र सुरूच

कलापुरे कुटूंबिय गेल्या चार वर्षांपासून पिंपरीगावात एकत्र राहत आहे. यापूर्वी ते खराळवाडी भागात राहण्यास होते. 5 जुलै रोजी त्यांच्या कुटूंबातील एका मुलास कोरोनाची लागण झाली. त्यांचे एकत्र कुटूंब असल्याने घरातील सर्व 18 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये कुटूंबातील सर्वचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पोपटराव, ज्ञानेश्‍वर आणि दिलीपराव या तिघांनाही ह्रदयासंबंधित आजार होते. आपल्याला करोना झाल्याची धास्ती या तिघांनीही घेतली.  10 जुलै रोजी उपचारादरम्यान दिलीप यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोपटराव यांचा 15 जुलै रोजी तर ज्ञानेश्‍वर यांचा 17 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गटारीसाठी आणली 19 बकरे अन् चोरट्यांनी मारला डल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com