esakal | मावळात रुग्णसंख्येने ओलांडला तीन हजारांचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

मावळात रुग्णसंख्येने ओलांडला तीन हजारांचा टप्पा

मावळ तालुक्यात रविवारी (ता. 20) दिवसभरात नव्याने ८४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

मावळात रुग्णसंख्येने ओलांडला तीन हजारांचा टप्पा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात रविवारी (ता. 20) दिवसभरात नव्याने ८४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला, तर बरे झालेल्या ८३ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार ३६ झाली असून, आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू  झाला आहे. तसेच, दोन हजार १४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ८४ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक ३२, तळेगाव दाभाडे येथील १६, वडगाव येथील ११, कामशेत येथील सात, पाटण येथील तीन, सोमाटणे, कुसगाव बुद्रुक, शिलाटणे व कान्हे येथील प्रत्येकी दोन; तर घोणशेत, गहुंजे, नायगाव, दारूंब्रे, भोयरे, जांबवडे व गोडूंब्रे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार ३६ झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार ७४५, तर ग्रामीण भागातील एक हजार २९१ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ९६७, लोणावळा येथे ५७० व वडगाव येथे रुग्णसंख्या २०८ एवढी झाली आहे. आतापपर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन हजार १४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

रविवारी ८३ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ९१६  सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ४०४ जण लक्षणे असलेले तर ५१२ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ४०४ जणांपैकी २९२ जणांमध्ये सौम्य तर १०५ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. सात जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ९१६ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

loading image