Fire Accident : पुण्यात गोदामाला भीषण आग; 3 कामगारांचा होरपळून मृत्यू

इव्हेंटचे मटेरियल असणाऱ्या गोदामाला आग लागून तिघे जण होरपळून मृत्युमुखी पडल्याची घटना
three workers dies in fire at decoration godown in wagholi pune
three workers dies in fire at decoration godown in wagholi punesakal

वाघोली – इव्हेंटचे मटेरियल असणाऱ्या गोदामाला आग लागून तिघे जण होरपळून मृत्युमुखी पडल्याची घटना वाघोलीतील उबाळे नगर परिसरात घडली. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. नऊ अग्निशामक दलाच्या वाहनांनी सहा तासाच्या आटोकाट प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली.

बिजन पात्रा ( वय 24 ) बिसवा सेन ( वय 26 ) व कमल ( वय 25 ) ( सर्व मूळ रा. पश्चिम बंगाल ) असे मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. गोदमाला लागूनच मागे काही खोल्या आहेत. तेथे हे कामगार राहत होते. मागील बाजूपासूनच आगीला सुरुवात झाली.

सजावटीचे सहित्य असल्याने आगीने पेट घेतला. 12 च्या सुमारास वाघोली पी एम आर डी ए चे अग्निशामक वाहने दाखल झाली. 16 पैकी काही जण बाहेर होते तर 10 जण आत होते. आग लागल्याचे कळताच तिघे वगळता बाकी जण बाहेर पडले. आत तिघे जण असल्याचे कोणालाही माहिती नव्हते. महापालिका अग्निशामक दलाचे वाहनही दाखल झाले.

ज्वालाग्राही साहित्य असल्याने आगीचा भडका उडाला होता. अनेक पाण्याच्या टँकरची ही मदत घेण्यात आली. आग आटोक्यात येत नसल्याने गोदमाच्या भिंती जे सी बी च्या साह्याने फोडून आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत गोदमाचा वरील पत्रा लोखंडी अंँगलसह पूर्णपणे खाली आला. काही खुर्च्या वगळता पूर्ण मटेरियल जळून खाक झाले.

मोठी आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशामक जवान पुढे पुढे जात आग विझवत होते. यावेळी दोघे जण होरपळून मृत्यू मुखी पडल्याचे तर एक जण पाण्याच्या हौदात पडून मृत्युमुखी पडल्याचे पहाटे निदर्शनास आले. या दरम्यान दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीचा फटका शेजारील गोदाम व गृहकुल सोसायटीला ही बसला.

सोसायटीच्या खिडकीच्या काचा फुटल्या तर पाईपही जळाले. सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक गजानन पवार व कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत. आशिष आगरवाल यांच्या शुभ सजावट इव्हेंट कंपनीचे हे गोदाम होते.महसूल विभागानेही घटनेचा पंचनामा केला.

खूप मोठा अनर्थ टळला

या गोदमाच्या मागेच इंडेन कंपनीचे गॅस सिलेंडर चे गोदाम आहे. रात्री तेथे 400 व्यवसायिक गॅस सिलेंडरचा साठा होता. आगीचे स्वरूप पाहता येथील सिलेंडर गोदामातून दुसरीकडे हलविण्यात आले. सुदैवाने मागील बाजूची भिंत उंच असल्याने आगीची झळा सिलेंडर गोदामा पर्यंत पोहचली नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

अनाधिकृत गोदाम

वाघोली परिसरात शेकडो गोदाम आहेत. यातील बहुतांश गोदाम अनाधिकृत आहेत. गोदाम बांधताना चारही बाजूला जागा सोडलेली नाही. गोदामांच्या भिंति एकमेकाना लागून आहेत. यामुळे अशा घटने वेळी अडचणी येतात या गोदामांचे कोणतेही सुरक्षा व फायर ऑडिट झालेले नाही.

कामगारांची नोंद नाही

अनेक गोदामात 5 ते 50 पर्यंत कामगार काम करतात. यातील बहुतांश कामगार परप्रांतीय आहेत. त्यांची काम करणाऱ्या ठिकाणीही नोंद दिसून येत नाही. काही दुर्घटना घडल्यास पोलिसांना त्यांची ओळख पटविण्यात व नातेवाईक शोधण्यास नाके नऊ येते. संबंधित कामगार विभागाचे ही दुर्लक्ष आहे.

दोन दिवसात आगीची दुसरी घटना

शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास याच परिसरात असणाऱ्या एका कंपनीला आग लागली होती. या कंपनीत हात पुसविण्याचे पेपर बनविले जात होते. मात्र ती आग लगेच आटोक्यात आली. तर रात्री 11.30 च्या सुमारास या इव्हेंट मटेरियल असणाऱ्या गोदमला आग लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com