esakal | सणासुदीच्या काळात भटक्‍या मेंढपाळावर उपासमारीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Dhangar

धनगर समाजातील भटकंती करून पोट भरण्याऱ्या मेंढपाळाची दयनीय अवस्था झाली आहे. बारा ही महिने उघड्यावर संसार थाटतात, एकावेळी तीन ते चार कुटुंब सोबतच असतात, शेळ्या, मेंढ्या, लोकरी विकुन कुटुंबाची गुजरान करताहेत. थंडीच्या दिवसात ही उघड्यावरच स्वयंपाक करतात व झोपतात. असेच औंध जिल्हा रूग्णालय आवारात गेल्या तीन महिन्यांपासून 70 वर्षीय प्रभू तांबे व त्यांचे कुटूंब राहत आहेत.

सणासुदीच्या काळात भटक्‍या मेंढपाळावर उपासमारीची वेळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - धनगर समाजातील भटकंती करून पोट भरण्याऱ्या मेंढपाळाची दयनीय अवस्था झाली आहे. बारा ही महिने उघड्यावर संसार थाटतात, एकावेळी तीन ते चार कुटुंब सोबतच असतात, शेळ्या, मेंढ्या, लोकरी विकुन कुटुंबाची गुजरान करताहेत. थंडीच्या दिवसात ही उघड्यावरच स्वयंपाक करतात व झोपतात. असेच औंध जिल्हा रूग्णालय आवारात गेल्या तीन महिन्यांपासून 70 वर्षीय प्रभू तांबे व त्यांचे कुटूंब राहत आहेत. कोरोना काळातही आम्हाला कोणतीही सरकारने मदत केली नाही. कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळेला शासनाने आर्थिक मदत करण्याची आर्त हाक तांबे यांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेळी पालन शेतीला पूरक व्यवसाय मानला जातो, पण भटकंती करणाऱ्या मेंढपाळाकडे शेती नसते. वर्षभरात, डोंगरदऱ्यात, गावोगावी किंवा चारा मिळेल त्या ठिकाणी आठ दिवस ते तीन - चार महिने एकाच ठिकाणी राहुट्या (पाल) ठोकून मुक्काम केला जातो. औंध जिल्हा रूग्णालयातील आवारात गेल्या तीन महिन्यांपासून स्थलांतरीत सिताराम तांबे, प्रभु तांबे व त्यांचे इतर नातेवाइकांनी उघड्यावर संसार थाटला आहे. शेळ्या, मेंढ्या, लोकरी विकुन कुटुंबाची गुजरान करताहेत. दहा ते बारा वयाचे लहान मोठे मुले आहेत. 50 ते 55 लहान मोठे कोकरे व करडू (पिल्ले) आहेत. सध्या त्यांच्याकडे उस्मानाबादी, संगमनेरी, माडग्याळ, जातीच्या शेळ्या, मेंढ्या आहेत. थोडया फार प्रमाणात क्कुकुटपालनही करत आहेत. स्वःताची व मेंढ्याची रक्षण करण्यासाठी कुत्रे पाळली आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज 162 नवीन रुग्ण  

प्रभू म्हणाले, 'आजही 150 शेळ्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी जात आहेत. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असाच प्रश्‍न सारखा सतावत असतो.'' 

सिताराम तांबे म्हणाले, 'आम्हाला लिहीता वाचता येत नाही. आमचे मुले ही शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळेला शासनाने आर्थिक मदत करावी. 

सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड म्हणाले, 'सरकारने ठोस उपाययोजना करून त्यांना मदत करावी. त्याचे मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. यासाठी प्रयत्न करावेत मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने विकास कुचेकर व आमचे शिष्टमंडळ लवकरच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुख्यमत्री यांना प्रत्यक्ष भेटून व निवेदन देऊन भटकंती मेंढपाळाच्या व्यथा माढणार आहोत. 

कारवाई शिस्तीसाठी की टार्गेटपूर्तीसाठी; वाहतूक पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू

विविध योजनांपासून अनभिज्ञ 
शासनाने "राजे यशवंत होळकर योजना' मेंढपाळासाठी केली आहे. पुण्यश्‍लोक आहील्याबाई होळकर महाराष्ट्र शेळी-मेंढ्या पालन विकास महामंडळ कार्यरत आहे, पण हे भटकंती करणारे मेंढपाळ या योजनेपासुन अनभिज्ञ असतात. त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांची माहिती नसते.

Edited By - Prashant Patil