स्वस्त अन्नधान्य दुकानांना कमी शिधा वितरित

अकरा परिमंडळ कार्यालयाअंतर्गत एकूण १२ लाख ७६ हजार ४८९ शिधापत्रिका धारक

स्वस्त अन्नधान्य दुकानांना कमी शिधा वितरित अकरा परिमंडळ कार्यालयाअंतर्गत एकूण १२ लाख ७६ हजार ४८९ शिधापत्रिका धारक

भोसरी, ता. १५ ः पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील स्वस्त अन्नधान्य दुकानात जानेवारी महिन्यात दिला जाणारा गहू १६. ५० टक्के तर तांदूळ ३९. ५० टक्के कमी आल्याची तक्रार काही स्वस्त धान्य दुकानदारांनी केली. त्यामुळे कमी आलेल्या शिधाचे वाटप आता केल्यास उर्वरित शिधा आल्यावर पुन्हा वाटप करावी लागणार असल्याने काम वाढणार असल्याची तक्रार काही दुकानदारांनी केली. तर उर्वरित तुटीचे धान्य २५ जानेवारीपर्यंत सर्व स्वस्त अन्न धान्य दुकानात पोहोच केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील एकूण अकरा परिमंडळ कार्यालयाअंतर्गत एकूण १२ लाख ७६ हजार ४८९ शिधापत्रिका धारक आहेत. तर या परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या स्वस्त अन्नधान्य दुकानांमध्ये जानेवारी महिन्यात एकूण वितरित करण्यात येत असलेल्या गहूपैकी ८३.५० टक्के तर तांदूळ ६०.५० टक्के वितरित केला आहे. स्वस्त अन्नधान्य दुकानदारांनी मिळालेले धान्य वाटप करण्यास सुरवात केल्यावर शिधा संपल्यावर नवीन येणारी शिधा पुन्हा नव्याने शिधापत्रिका धारकांना वाटप करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे शिधा लवकर प्राप्त न झाल्यास शिधा पत्रिका धारकांना स्वस्त अन्नधान्य दुकानांमध्ये चकरा माराव्या लागणार आहेत. त्याचप्रमाणे शिधा उशिरा स्वस्त अन्नधान्य दुकानात आल्यास शिधा पत्रिका धारकांना धान्य उशिरा मिळणार असल्याने त्यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अंत्योदय योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांसाठी (दारिद्र रेषेखालील शिधापत्रिका धारक) मिळणारी शिधा शंभर टक्के स्वस्त अन्नधान्य दुकानात पोचविण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

इन्फोबॅाक्स

महिना लाभार्थी (शिधापत्रिका धारक) गहू(मेट्रीकटन) तांदूळ (मेट्रीक टन)
डिसेंबर २१ १२७५५४५ ३८२६.६५० २५५०.९५०
जानेवारी २२ १२७६४८९ ३२००.१० १५४४.५००


‘‘यापूर्वी कधीच शासनाद्वारे कमी शिधेचा पुरवठा झाला नाही. मात्र, या महिन्यात कमी येणाऱ्या शिधाची घटना पहिलीच आहे. आता आलेल्या शिधाचे वाटप शिधापत्रिका धारकांना केल्यावर नवीन येणारी शिधा वाटपासाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे.’’
- दिलीप दंडवते, स्वस्त धान्य दुकानधारक, दिघी

‘‘महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे गुरुवारी (ता. १३) जानेवारी महिन्यात वाटप करण्यात येत असलेल्या अन्नधान्याचे सुधारित नियतनाचा जीआर प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार राज्यासह पुणे जिल्ह्यातील सर्वच स्वस्त अन्नधान्य दुकानांमध्ये योग्य शिधांचा पुरवठा २५ जानेवारीपर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे सर्व शिधा पत्रिका धारकांना योग्य शिधा याच महिन्यात मिळेल.’’
- सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com