बेबडओहोळ-पिंपळखुटेच्या उपसरपंचपदी कविता ढमाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेबडओहोळ-पिंपळखुटेच्या उपसरपंचपदी कविता ढमाले
बेबडओहोळ-पिंपळखुटेच्या उपसरपंचपदी कविता ढमाले

बेबडओहोळ-पिंपळखुटेच्या उपसरपंचपदी कविता ढमाले

sakal_logo
By

बेबडओहोळ, ता. ६ : बेबडओहोळ-पिंपळखुटे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता राजेंद्र ढमाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्वांना समान काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने रिक्त असलेल्या पदावर ढमाले यांची निवड करण्यात आली.
सरपंच सविता सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ढमाले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांच्या नावाची घोषणा ग्रामसेवक रमादेवी राऊत यांनी केली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य नम्रता घारे, जालिंदर गराडे, संदीप घारे, कमल गराडे, संध्या शिंदे, मनीषा घारे, तुषार बारमुख, बाळू ठाकर, सुधीर गायकवाड, लताबाई गायकवाड उपस्थित होते.
निवडणूक यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्चना घारे, अशोक घारे, मधुकर घारे, बबनराव घारे, बाबूराव घारे, धनंजय घारे, सेवक घारे, विक्रम घारे, रोहिदास गराडे यांनी प्रयत्न केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top