
‘सोसायटीच्या सभासदांना जाहीर केलेली मदत मिळावी’
पिंपरी - कोरोना प्रतिबंधक (Corona Restriction) लसीकरणासाठी महापालिकेकडे (Municipal) ३० हजार ८०० डोस (Dose) उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था सोमवारी (Monday) (ता. २०) शहरातील ६४ केंद्रांवर व्यवस्था केली आहे. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.
कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला व दुसरा डोस घेण्याची व्यवस्था ५६ केंद्रांवर केली असून प्रत्येक केंद्रावर ५०० डोस उपलब्ध आहेत. कोव्हॅक्सिन लस आठ केंद्रांवर दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर साडेतीनशे डोस उपलब्ध आहेत. दोन्ही प्रकारच्या लशींचे प्रत्येकी ५० टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंदणी करून व किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन दिले जाणार आहेत. लस घेण्यासाठी ‘कोविन ॲप’ वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल.
नऊ केंद्रांवर ११ तास
महापालिकेचे कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी आणि अण्णा भाऊ साठे विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी या केंद्रांवर सकाळी नऊ ते रात्री आठ असे ११ तास आणि अन्य ४७ केंद्रांवर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत कोव्हिशिल्ड लस दिली जाणार आहे.
हेही वाचा: ख्रिसमस सेलिब्रेशन, उत्सव सणाचा -
कोव्हॅक्सिनसाठी केंद्र
ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर दिली जाणार आहे.
गर्भवतींसाठी स्वतंत्र व्यवस्था
स्तनदा माता व गर्भवतींसाठी जुने भोसरी रुग्णालय, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, अण्णा भाऊ साठे विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.
दृष्टिक्षेपात आजचे लसीकरण
लशीचा प्रकार - केंद्र - डोस
कोव्हिशिल्ड - ५६ - २८,०००
कोव्हॅक्सिन - ८ - २,८००
एकूण - ६४ - ३०,८००
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..