covid 19 vaccination
covid 19 vaccinationesakal

पिंपरीसाठी शुक्रवारी तीस हजार डोस

पिंपरी, ता. २३ : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यवस्था शुक्रवारी (ता. २४) ६४ केंद्रांवर महापालिकेने केली आहे. त्यासाठी कोव्हिशिल्ड लशीचे २८ हजार आणि कोव्हॅक्सिन लशीचे दोन हजार ८०० असे ३० हजार ८०० डोस अनुक्रमे ५६ व आठ केंद्रांवर उपलब्ध आहेत. स्तनदा माता व गर्भवतींसाठी आठ केंद्रांवर काही डोस राखीव ठेवले आहेत. सर्व केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे. (Pimpri Chinchwad Municipal Corporation corona vaccine doses update)

कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. दोन्ही मिळून प्रत्येक केंद्रावर ५०० डोस उपलब्ध आहेत. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर साडेतीनशे डोस उपलब्ध आहेत. दोन्ही प्रकारच्या लशींचे प्रत्येकी ५० टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंदणी करून व किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन दिले जाणार आहेत. लस घेण्यासाठी ‘कोविन ॲप’ वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. लशीकरणाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा अशी आहे. मात्र, वायसीएम रुग्णालयात दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत लस दिली जाणार आहे. (Pimpri Latest News)

कोव्हिशिल्डचे ११ तास केंद्र
महापालिकेचे कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी आणि दीनदयाळ शाळा संत तुकारामनगर पिंपरी या केंद्रांवर सकाळी नऊ ते रात्री आठ असे ११ तास कोव्हिशिल्ड लस देण्याची व्यवस्था केली आहे. (Covid Vaccine Doses)

कोव्हॅक्सिनसाठी केंद्र
ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.

गर्भवतींसाठी स्वतंत्र व्यवस्था
स्तनदा माता व गर्भवतींसाठी जुने भोसरी रुग्णालय, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, वायसीएम हॉस्पिटल संत तुकारामनगर पिंपरी (दुपारी २ ते रात्री ८), अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com