crime
crime sakal

पिंपरी चिंचवडमधील आजचे गुन्हे वृत्त

नऊ जणांच्या टोळक्याने दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटला. तसेच शिवीगाळ करीत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी पिंपरी येथे घडली.
Summary

नऊ जणांच्या टोळक्याने दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटला. तसेच शिवीगाळ करीत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी पिंपरी येथे घडली.

पिंपरी - नऊ जणांच्या टोळक्याने (Gang) दोघांना मारहाण (Beating) करून त्यांच्याकडील ऐवज लुटला. तसेच शिवीगाळ करीत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी पिंपरी येथे घडली. (todays crime cases in pimpri chinchwad)

विकी सौदे (वय३०), अमित सौदे (वय२५), सोनू बिडलान (वय२४), गोपी घलोत (वय २७, सर्व रा. सुभाषनगर, पिंपरी), बल्ली राऊत (वय २६, रा. काळेवाडी) व चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमीत सुनील बहोत (वय २६, रा. मिलिंदनगर, पिंपरी, मूळ- पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (ता. २३) रात्री साडे अकराच्या सुमारास पिंपरीतील डॉ. आंबेडकर कॉलनी येथील रस्त्यावर आरोपींनी फिर्यादी व त्यांचे मित्र राज जाधव, सय्यद खान यांना अडवले. सुमीत व राज यांना दगडाने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. तसेच सुमितच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी व राज यांचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर सईद खानला तोंडावर मारहाण करीत शिवीगाळ व धमकी दिली. ‘हम यहा के भाई है, कौन बीच मे आता है देखता हु’ असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पैसे उसने घेतल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

पिंपरी - पैसे उसने घेतल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. हा प्रकार बावधन येथे घडला. शरद धनाजी गवारे (रा. बावधन) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शाम द्वारकानाथ शेळके (वय २५, बावधन ) व निखिल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी पाच दिवसांपूर्वी आरोपींकडून ४०० रुपये हात उसने घेतले होते. या कारणावरून आरोपी निखिल याने फिर्यादीला पकडले, तर शाम याने डोक्यात दगड मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

प्रवासी महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएमल) बसमध्ये चढत असताना, प्रवासी महिलेच्या बॅगमधून चोरट्याने दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरले. ही घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी इंदिरा विष्णू थोरात (रा. एल.बी. एस मार्ग, ठाणे पच्छिम , ठाणे ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या शुक्रवारी (ता.२४) भोसरीतील पीएमपीएमएल बसथांब्याच्या ठिकाणी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी चोरट्याने गर्दीचा फायदा घेत फिर्यादी यांच्या खांद्याला अडकविलेल्या बॅगची चैन उघडून त्यातील एक लाख ९२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

crime
पिंपरी-चिंचवडमध्ये आज ६३ नवीन रुग्ण

माहेराहून एक लाखासाठी विवाहितेचा छळ

पिंपरी - पतीला नवीन दुचाकी घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणावेत यावरून विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे.

पती किशोर दशरथ मोहिते (वय २५), दिर ईश्वर (वय ३०), ज्ञानेश्वर (वय ३३), संजय (वय ३५), सासरा दशरथ मोहिते (वय ५०), सासू व दोन जाऊ (सर्व रा. मु. पो. पिंपळगाव, ता. निफाड, जि, नाशिक ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा पती किशोर याला नवीन दुचाकी घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणण्यास फिर्यादीला सांगितले. मात्र, फिर्यादीने पैसे न आणल्याने आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच घरात तीन दिवस डांबून ठेवून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

पिंपरी - बेकायदेशीररीत्या कोयता बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली. कृष्णा तुळशीराम राऊत (वय २२, रा. काळा खडक, वाकड , मूळ- उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (ता. २४) रात्री पावणे दहाच्या सुमारास भूमकर चौक ते डांगे चौक या रस्त्यावर आरोपी कोयता घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत दहशत निर्माण करीत होता. दरम्यान, वाकड पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. अधिक तपास सुरु आहे.

विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

पिंपरी - विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिखली येथे घडला. पती शंकर चिमणराव नेवाळे (वय ३७), सासरा चिमणराव पर्वती नेवाळे (वय ६०) व सासू (सर्व रा. नेवाळे वस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी शिवीगाळ व हाताने मारहाण केली. वाईट वागणूक देत फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com