नवीन वषाचे सेलिब्रेशन शांततेत

नवीन वषाचे सेलिब्रेशन शांततेत

ना फटाक्यांची आतषबाजी ना गोंगाट

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन शांततेत; पर्यटन ठिकाणेही ‘हाउसफुल्ल’

पिंपरी, ता. १ : कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि जमावबंदीचे आदेश असल्याने नवीन २०२२ या वर्षाचे सेलिब्रेशन नेहमीपेक्षा शांततेत झाले. बऱ्याच जणांनी घरातच कुटुंबीयांसमवेत जेवणाचा बेत केला तसेच बऱ्याच खवय्यांना जेवणासाठी हॉटेलची वाट धरली. अनेक जणांनी हॉटेलांचे आगाऊ बुकिंग केले होते. नामाकिंत हॉटेलबाहेर गर्दी असल्याचे दिसले. पर्यटन ठिकाणेही हाउसफुल्ल झाली होती. परंतु, ‘ना फटाक्यांची आतषबाजी ना प्रदूषण, गोंगाट’ असे चित्र शहरात न आढळल्याने अनेकांनी सुस्कारा सोडला.
शहरात कोणताही उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. दोन वर्षांत कोरोना आणि लॉकडाउन असल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. सण-समारंभ साजरे करता आले नाही. दरवर्षी फटाक्यांची आतषबाजी होते. बारानंतरही डीजेचा दणदणाट सुरू असतो. त्यामुळे ज्येष्ठ आणि चिमुकल्यांची झोप उडते. प्रदूषणाचा उच्चांक गाठला जातो. तसेच, दुसऱ्या दिवशी फटाक्यांचा कचरा साफ करून स्वच्छतादूत मेटाकुटीला येतात. चौकाचौकात लागलेले डॉल्बीचा कर्णकर्कश आवाजाने बहिरेपणा निर्माण होण्याची भीती असते.
अनेकांचा थर्टी फस्ट साजरा होत असला तरी, दुसरीकडे नोकरदारांचा दिवस पूर्णपणे वाया जातो. अनेक मद्यप्रेमी रस्त्यावरही चित्र-विचित्र स्थितीत आढळून येतात. अनेकजण पब आणि डिस्को तसेच शहराबाहेर व शहरातही ओंगळवाणे प्रदर्शन करतात. यावर्षी हे चित्रच पालटल्याचे दिसून आले. याउलट, अनेक युवकांनी यावर्षी रक्तदान शिबिर आणि समाजपयोगी उपक्रम राबवून सामाजिक संदेश दिला. सामाजिक जबाबदारीचे भान जपले. कित्येकदा महिलांना ३१ डिसेंबरच्या रात्री तळीरामांमुळे घराबाहेर पडणे अवघड होते. पोलिसांची गस्त, नाकाबंदीमुळे शहरात सुरक्षा राहते. तरीही, तळीराम पोलिसांच्या हातावर तुरी देवून दरवेळी पसार होत असल्याचे दिसते.

असे झाले सेलिब्रेशन
घरातूनच अनेकांनी रात्री बारापासून व्हिडिओ कॉल, संदेशाची देवाण घेवाण केली. प्रियजनांना अनेकांनी कॉल केले. बऱ्याच जणांनी त्यानिमित्त गेट टू गेदर साजरा केला. युवक-युवतींनी हॉटेल अन्‌ किटी पार्ट्या केल्या. बरेच जण खासगी बंगले, रो हाउस आणि टेंट करून राहिले. तसेच, छोट्या ट्रीपसाठी गावाकडे गेले. बऱ्याच जणांनी गोवा, महाबळेश्वर व इतर नैसर्गिक ठिकाणचा आनंद घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com