पुन्हा महाविद्यालये बंद, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर अनेक प्रश्‍न ?

शासनाने योग्य उपाययोजना आखत महाविद्यालये सुरूच ठेवावीत
3rd Covid Wave: School college closed again
3rd Covid Wave: School college closed again sakal

पुणे : लॉकडाऊनच्या (Lockdown)काळात घरी बसून मुलांच्या शिक्षणाबरोबरच सामाजिक, नैतिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. त्यात आता पुन्हा महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. महाविद्यालये बंद करून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने योग्य उपाययोजना आखत महाविद्यालये सुरूच ठेवावीत. अशी विनंती ब्राह्मण महासंघ पालक आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

3rd Covid Wave: School college closed again
पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये एकदाच पैसे भरा, दर महिन्याला मिळवा व्याज

या प्रसंगी पालक आघाडीच्या मधुरा बर्वे, अपर्णा वैद्य, अर्चना मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाविद्यालये सुरू ठेवण्यासाठी ब्राह्मण महासंघाच्या पालक आघाडीने एक समिती स्थापित करून त्या आधारे काही उपाय योजना शासनाकडे मांडल्या आहेत. त्यामध्ये महाविद्यालये अर्धवेळ सुरू ठेवणे, विद्यार्थ्यांचे लसीकरण त्वरित करने अशा विविध उपाययोजनांचा समावेश आहे. तर शासनाने या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.(Pune news)

3rd Covid Wave: School college closed again
आंबिल ओढ्याच्या अतिक्रमणांमुळे पुराचा धोका

यावेळी दवे म्हणाले, "महाविद्यालये सुरू ठेवण्यासाठी ब्राह्मण महासंघाच्या पालक आघाडीने एक समिती स्थापित करून त्या आधारे काही उपाय योजना शासनाकडे मांडल्या आहेत. त्यामध्ये महाविद्यालये अर्धवेळ सुरू ठेवणे, विद्यार्थ्यांचे लसीकरण त्वरित करने अशा विविध उपाययोजनांचा समावेश आहे. तर शासनाने या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. " बर्वे म्हणाल्या, " कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीत वारंवार होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेचा सामना विद्यार्थ्यांना भविष्यात करायचा आहे. त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची तयारी विद्यार्थ्यांची होत नाही."

3rd Covid Wave: School college closed again
इचलकरंजी : दारू पिण्यासाठी तीस रुपये न दिल्याच्या कारणातून खून

दोन वर्षात विद्यार्थांची अभ्यासाची संपुर्ण सवयच मोडीत निघाली असून साधी लिखान किंवा वाचनाची सवय तुटल्याचे प्रकर्षाने जानवत आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर देऊन अभ्यासातील सातत्य टिकावे यासाठीचे प्रयत्न करावेत. असे अर्चना मराठे यांनी सांगितले.तारे म्हणाल्या, "विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून हा आधारस्तंभ जपणे आपले कर्तव्य आहे सातत्याने महाविद्यालये बंद असल्याने मुले नैराश्याच्या दिशेने जात आहेत याचा विचार करून वेळप्रसंगी कठोर निर्बंध लावून व पुरेशी यंत्रणा सज्ज करून महाविद्यालये चालूच ठेवावी. पदवी किंवा द्विपदवी अभ्यासक्रमातील अभ्यास तसा ऑनलाईन शिकणे कठीण जाते त्याकरिता प्रत्यक्ष महाविद्यालयातील शिक्षण महत्वाचे असल्याने किमान अर्धवेळ तरी महाविद्यालये चालू ठेवावी."लवकरच मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व आरोग्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंबंधी विनंती करण्यात येणार आहे. असेही दवे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com