हिंजवडी, माण, पिंपळे-सौदागर, वाकड उच्चभ्रू परिसरामध्ये ५० ते ७५ लाखांच्या घरांची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंजवडी, माण, पिंपळे-सौदागर, वाकड उच्चभ्रू परिसरामध्ये ५० ते ७५ लाखांच्या घरांची विक्री
हिंजवडी, माण, पिंपळे-सौदागर, वाकड उच्चभ्रू परिसरामध्ये ५० ते ७५ लाखांच्या घरांची विक्री

हिंजवडी, माण, पिंपळे-सौदागर, वाकड उच्चभ्रू परिसरामध्ये ५० ते ७५ लाखांच्या घरांची विक्री

sakal_logo
By

भाग २

आयटीयन्सचा कल हिंजवडी, माण, पिंपळे-सौदागर, वाकडमध्ये : टोलेजंग व महागड्या घरांच्या खरेदीला सर्वाधिक मागणी

पिंपरी, ता. ८ : पिंपरी-चिंचवड शहरात मध्यमवर्गीय व उच्चभ्रू सोसायटीतील नागरिक घर घेताना परिसर, शांतता, वाहतूक कोंडीमुक्त, शैक्षणिक व इतर सोयीसुविधा, सर्वाधिक उंच मजल्यावरील प्रदूषणविरहित घर व महत्त्वाचे म्हणजे, खिसा अशा विविध बाबीं पाहतात. सध्या २५ ते ५० व ५० ते ७५ लाखांपर्यंतच्या महागड्या व टोलेजंग घरांच्या विक्रीला सर्वाधिक पसंती आहे. शहरात हिंजवडी, माण, पिंपळे-सौदागर, वाकड या भागात ५० ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या घर खरेदीला सर्वाधिक मागणी असल्याचे क्रेडाई महामेट्रो व सीआरई मॅट्रिक्सच्या अहवालावरून दिसून आले आहे.

२०१७ ते २०२१ या कालावधीत २५ लाखांपर्यंतच्या घरातून केवळ ३ हजार ६८३ कोटींची उलाढाल झाली. तसेच, २५ ते ५० लाखांमधल्या घर विक्रीतून १९ हजार ५२४ कोटी आणि ५० ते ७५ लाख किमतीच्या घरातून १५ हजार ९३९ कोटीची उलाढाल झाली. त्या तुलनेत, शहरात ७५ लाख ते एक कोटी व त्यापुढील किमतीच्या घरांना अत्यल्प मागणी कमी आहे. शहरात कामगार वर्ग तसेच छोट्या व्यावसायिकांची संख्या देखील मोठी असल्याने अद्यापपर्यंत वन आणि टू बीएचके घरांनाच जास्त मागणी आहे. आयटी अभियंता तसेच व्यावसायिक गुंतवणूक करताना एकापेक्षा अधिक घरांमध्ये गुंतवणूक करताना पहावयास मिळत आहे. एक कोटी रुपयांच्या घरांमध्ये मागील पाच वर्षात २ हजार ९५३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

मागील पाच वर्षामध्ये २०१७ ते २०२१ या कालावधीत वाकडमध्ये २०१८ साली ३ हजार ६०६ घरांमध्ये २ हजार १६४ कोटींची व २०१९ मध्ये १ हजार ९४६ कोटींच्या ३ हजार २३३ घरांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. तर, २०२० मध्ये १ हजार ५९९ कोटी, २०२१ मध्ये १ हजार ५४४ कोटी गुंतवणूक घरांमध्ये झाली आहे. कोरोना काळात देखील या परिसरामध्ये नागरीकांनी घर खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरात ५० ते ७५ लाखांच्या घरांना सर्वाधिक मागणी आहे. २०१७ साली सर्वाधिक गुंतवणूक पिंपळे सौदागर परिसरामध्ये झाली आहे. ९३५कोटी इतक्या किमतीची घरे खरेदी झाली असून १ हजार ७५६ इतक्या सर्वाधिक घरांची विक्री झालेली आहे. परंतु, २०२० व २०२१ साली कोरोना काळामुळे काही अंशी महागडी घरे खरेदी करण्याचे बजेट कोलमडल्याचे दिसून आले आहे. २०२१ साली ९४७ घरांची विक्री झाली असून ६३२ कोटी रुपये किमतीची घरांची विक्री झाली आहे. तसेच, हिंजवडी व माणमध्ये २०१८ मध्ये ३१७४ घरांची विक्री १७२८ करोड रुपयांची झाली असून २०१९ मध्ये १६५० कोटी रुपये इतक्या ३ हजार २१० घरांची विक्री झाली आहे. परंतु, २०२१ मध्ये या भागातील घरांच्या विक्रीचा आलेख घसरलेला आहे. हा सर्व परिसर आयटी कंपन्याने व्यापला असल्याने आयटीयन्सची या भागात घर खरेदी करण्याकडे सर्वाधिक उडी आहे.
---
शहरात २५ ते ५० लाख व ५० ते ७५ लाख रुपयापर्यंतच्या घरांची झालेली विक्री व उलाढाल :

आकडे बोलतात...

(घरांच्या किमती कोटीमध्ये)
वर्ष २५ लाखांत २५ ते ५० लाखांत ५० ते ७५ लाखात ७५ ते १०० लाखात १०० लाखाच्यावर
२०१७ ६७८ २९७९ २५९६ ५९४ ४८४
२०१८ ७३४ ३७६६ ३५७४ ९७१ ६३५
२०१९ ८७१ ४३०० ३४७१ ८६६ ६०४
२०२० ७३९ ४३४६ ३४५४ ८५९ ६२५
२०२१ ६६१ ४१३३
२८४४ ८४६ ६०५

एकूण ३६८३ १९५२४ १५९३९ ४१३६ २९५३

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top