बेकायदा गॅस रिफिलिंगप्रकरणी दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा गॅस रिफिलिंगप्रकरणी दोघांवर गुन्हा
बेकायदा गॅस रिफिलिंगप्रकरणी दोघांवर गुन्हा

बेकायदा गॅस रिफिलिंगप्रकरणी दोघांवर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ : बेकायदेशीररीत्या घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस रिफिलिंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने थेरगाव येथे केली.
किरण अभिमन्यू बिरादार (वय २१, रा. जय मल्हार नगर, थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली असून गणेश राऊत (वय ३२, रा. शिवराज कॉलनी, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी संगनमत करून त्यांच्या थेरगावमधील संदीपनगर येथील जय गणेश गॅस अँड इलेक्ट्रिक या दुकानात धोकादायकरीत्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये रिफिलिंग करीत होते. याबाबत माहिती मिळाली असता त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकून रोकड व गॅस सिलिंडर असा एकूण अकरा हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याद्वारे आरोपींनी ग्राहकांची व शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top