आता ग्रीन मार्शनलची ‘नजर’

आता ग्रीन मार्शनलची ‘नजर’

पिंपरी, ता. १२ ः तुम्ही मास्क घातलेले नाही. गर्दी केली आहे. रस्त्यावर थुंकलात. कचरा टाकताय. अस्वच्छता करताय. तर तुमच्यावर महापालिकेच्या ग्रीन मार्शल पथकाची ‘नजर’ आहे. या पथकाने पहिल्याच दिवशी तब्बल २१० नागरिकांवर कारवाई करून एक लाख सहा हजार १६० रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे तुम्ही जर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नसाल, अस्वच्छता करीत असाल तर, तुम्हालाही दंड भरावा लागेल.
कोरोना व ओमिक्रॉनची साथ आणि स्वच्छ भारत अभियान अर्थात आरोग्य व पर्यावरण संवर्धन या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांचा समावेश असलेले ग्रीन मार्शल पथक नियुक्त केले आहे. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रानुसार त्यांच्याकडून दोन सत्रांत निगराणी सुरू आहे. मास्क नसल्यास किंवा गर्दी केलेली असल्यास प्रत्येकी पाचशे रुपये आणि रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांकडून किमान १८० व कमाल पाच हजार रुपये दंड वसूल केला जात आहे.

विनामास्क १७० जण
कोरोना प्रतिबंधक नियमानुसार मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. गर्दीवर निर्बंध आहेत. जमाव बंदी व रात्रीची संचार बंदी लागू आहे. तरीही काही जण मास्क न घालताच फिरत असल्याचे चित्र आहे. अशा १७० जणांवर ग्रीन मार्शन पथकांनी कारवाई करून ८८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर अस्वच्छता करणाऱ्या ४० जणांनी १८ हजार १६० रुपये दंड भरला आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाई व दंड वसुली
कार्यालय / व्यक्ती / दंड
अ / ३२ / १६,०००
ब / १७ / ७,५४०
क / ४ / १,६८०
ड / ३७ / १९,५००
ई / ३७ / ११,८२०
फ / २५ / १४,०००
ग / १८ / १५,५००
ह / ४० / २०,१२०
एकूण / २१० / १,०६,१६०

‘‘कोरोना प्रतिबंधक नियमांचे अर्थात मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, जमावबंदी, तसेच पर्यावरण संवर्धन व स्वच्छ शहरासाठी प्लॅस्टिक बंदी आहे. उघड्यावर कचरा टाकणे, अस्वच्छता करण्यास बंदी आहे. यांचे पालन होते किंवा नाही, याची पाहणी करण्यासाठी आणि पालन होत नसल्यास बेशिस्त व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ग्रीन मार्शन पथकाची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालय स्तरांवर कारवाई सुरू आहे.
- शिरीष पोरेडी, प्रवक्ता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com