पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी मुलांसाठी २२ केंद्रांवर ११,७५० डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child vaccination.
पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी मुलांसाठी २२ केंद्रांवर ११,७५० डोस

पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी मुलांसाठी २२ केंद्रांवर ११,७५० डोस

पिंपरी - शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी (Children) महापालिकेतर्फे (Municipal) शुक्रवारी (ता. १४) २२ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लशीचे (Corona preventive vaccine) ११ हजार ७०० डोस (Dose) उपलब्ध झाले आहेत. हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाइन वर्कर, साठ वर्षांवरील नागरिक आणि बीपी, मधुमेह, कर्करोग अशा सहव्याधी असलेल्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या प्रिकॉशन अर्थात बूस्टर डोससह (Booster Dose) १८ वर्षांवरील सर्वांसाठी २४ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था ५१ केंद्रांवर केली आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.

मुलांसाठी प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड केंद्रावर ७५० व नवीन थेरगाव रुग्णालय केंद्रावर एक हजार डोस उपलब्ध आहेत. ते, एएसआय मोहननगर, आरटीटीसी शाहूनगर, पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, पुनावळे दवाखाना, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, भोसले दवाखाना नेहरूनगर, कन्या शाळा चिखली, मगर शाळा पिंपळे सौदागर, जुने व नवीन भोसरी रुग्णालय, शाहू विद्यालय दिघी, नेहरू शाळा चऱ्होली, काळभोर गोठा उर्दू शाळा यमुनानगर, मोरे वस्ती शाळा नंबर ९२, भानसे स्कूल यमुनानगर, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिंपरी, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर पिंपरी, होळकर स्कूल सांगवी, बालाजी लॉन्स नवी सांगवी या केंद्रांवर प्रत्येक ५०० डोस उपलब्ध आहेत. १८ वर्षांवरील सर्वांना व बूस्टर डोस घेणाऱ्यांना ४१ केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, नवीन थेरगाव रुग्णालय, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, लांडगे नाट्यगृह भोसरी, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरी वाघेरे, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.

हेही वाचा: हर्षदाने बनविलेल्या मास्क वापर व नष्ट करणाऱ्या उपकरणाची इंडियन पेटंट जनरल मध्ये नोंद

सात केंद्रांवर ११ तास

कोविन ॲपद्वारे स्लॉट बुकिंग करून, ऑन दि स्पॉट नोंद करून व किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊनही लस दिली जाणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, लांडगे नाट्यगृह भोसरी, काळभोर गोठा बालवाडी यमुनानगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, आचार्य अत्र नाट्यमंदिर पिंपरी या केंद्रांवर सकाळी नऊ ते रात्री आठ असे ११ तास लसीकरण सुरू राहणार आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा ३९ आठवडे झालेल्यांनाच बूस्टर डोस दिला जाणार आहे.

गर्भवतींसाठी व्यवस्था

स्तनदा माता व गर्भवतींसाठी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top