हर्षदाने बनविलेल्या मास्क वापर व नष्ट करण्याच्या उपकरणाची इंडियन पेटंट जनरल मध्ये नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harshada Namdev Talpe
हर्षदाने बनविलेल्या मास्क वापर व नष्ट करण्याच्या उपकरणाची इंडियन पेटंट जनरल मध्ये नोंद

हर्षदाने बनविलेल्या मास्क वापर व नष्ट करणाऱ्या उपकरणाची इंडियन पेटंट जनरल मध्ये नोंद

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील विद्यार्थीनी हर्षदा नामदेव तळपे (Harshada Namdev Talpe) या इंजिनिअर(Engineer) विद्यार्थीनीने बनवलेल्या मास्क वापर व नष्ट करणा-या मशिनच्या (use and destruction of mask)आराखड्याची इंडियन पेटंट जनरल (Indian Patent General)मध्ये नोंद झाली आहे.आकुर्डी पुणे येथील, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंगची हर्षदा विद्यार्थ्यीनी आहे.ड्युअल ऑपरेटिंग मास्क व्हेंडिंग मशीन विथ यूज्ड मास्क डिस्ट्रॉयिंग युनिट बाय क्रशिंग मेथड ह्या मॉडेलची निर्मिती केली आहे.वापरलेले मास्क नष्ट करणे तसेच नविन मास्क यातून एटीएम मशिन सारखे घेता येणार आहेत.

हेही वाचा: चार वर्षांनंतर झाली मायलेकाची भेट; पोलिसांच्याही डोळ्यात आले पाणी! 

याचबरोबर हात निर्जंतुकीकरणाची यात सुविधा असणार आहे. या मशीनद्वारे आपणास सर्जिकल व एन ९५ मास्क मिळतील व आपणास आपले हात देखील सॅनिटाइज करता येणे शक्य होईल. त्याच बरोबर वापरलेल्या मास्कचे निर्जंतुकीकरण करून तो नष्ट देखील करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मशीनचे भारत शासनाकडे पेटंट फाईल केले असून त्याचे शासनाच्या पेटंट जरनल मध्ये प्रकाशन झाले आहे.हर्षदा तळपे व इतर सहकारी विद्यार्थी,अक्षयकुमार शिंदे, शुभम चतुर्वेदी , रितूला तायडे यांनी प्रा. श्यामसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने ह्या स्वयंचलित मॉडेल ची निर्मिती केली.या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या मालथी जेसूडासोन संचालक डॉ.नीरज व्यवहारे, तेजस पाटील अध्यक्ष सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

हेही वाचा: भारत-पाकिस्तान फाळणीत झाली ताटातूट, तब्बल 74 वर्षांनंतर भेट!

उपकरणाचे वैशिष्ट्ये

•नवीन मास्क घेणे व वापरलेला मास्क नष्ट करणे सहज सोपे होईल व परिसर स्वच्छ राहील .

•वापरून झालेल्या मास्कची विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे .

•वेळेची बचत शक्य .

•हात निर्जंतुक करणे तसेच मास्क विकत घेत व वापरलेला मास्क नष्ट करणे सोपे.

•मशीन सर्व वयोगटातील व्यक्ती साठी फायदेशीर.

•पर्यावरण पूरक आणि प्रदूषण रहित असल्याने या मशीनची देखभाल करणे सुलभ.

•उपकरणामुळे कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी निश्चित हातभार लागेल.

हेही वाचा: देशात कोरोनाचा स्फोट; PM मोदींची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

वापरलेले मास्क व त्याची चुकीच्या पद्धतीने लावलेली विल्हेवाट लक्षात घेऊन हे कंपोझिट मॉडेल तयार करण्यात येत आहे .मास्क व्हेंडिंग मशिन प्लस डिस्पोझिंग मशीन हे हाताळण्यास सोपे व युजर फ्रेंडली असून सुरक्षित देखील आहे. या व्हेंडिंग युनिट ची साठवणूक क्षमता सध्या ४० मास्क इतकी आहे तसेच हॅन्ड टु हॅन्ड टच टाळुन व निर्जंतुकीकरण करून विघटन करणे कमी कालावधीत शक्य होणार आहे .

-प्रा.श्यामसिंग ठाकूर मार्गदर्शक,डी. वाय. पाटील

शिक्षण घेत असताना आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड प्रात्यक्षिक पद्धतीने करून ते कौशल्यपूर्ण पद्धतीने निर्माण करणे हा कुतूहलाचा विषय आहे.”

- डॉ.विजयकुमार जत्ती- यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख

सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण मानव जातीला वेठीस धरले आहे, त्यामुळे या कंपोझिट मशीनची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त आहे.

- डॉ.प्रदिप नन्नावरे अध्यक्ष पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन

या स्वयंचलित मशीन चा उपयोग व्यवसायीक, खाजगी आणि सरकारी कार्यालयात करता येईल, तसेच हे मशिन कोरोना संसर्ग रोखण्यात मदत करेल.

- महापौर उषा ढोरे

Web Title: Record In Indian Patent General Of The Use And Destruction Of Masks Made By Harshada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top