अश्लील मजकुराद्वारे
कुटुंबाची बदनामी
Sakal

अश्लील मजकुराद्वारे कुटुंबाची बदनामी

लोणावळा नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होणाऱ्या सदस्यांमध्ये अपक्षांची संख्या अधिक असते. अपवाद केवळ या मावळत्या सभागृहाचा राहिला.
Summary

लोणावळा नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होणाऱ्या सदस्यांमध्ये अपक्षांची संख्या अधिक असते. अपवाद केवळ या मावळत्या सभागृहाचा राहिला.

लोणावळा नगरपरिषद (Lonavala Nagarparishad) पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होणाऱ्या सदस्यांमध्ये अपक्षांची संख्या अधिक असते. अपवाद केवळ या मावळत्या सभागृहाचा राहिला. अन्यथा सत्ता मिळविण्यासाठी दरवेळी नवा ‘लोणावळा पॅटर्न’ (Lonavala Pattern) होत असतो. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) नगराध्यक्षपदासह अकरा जागा मिळवल्या. नंतर अचानक काँग्रेसचा (Congress) हात हातात घेवुन पाच वर्षे कारभार हाकला. मात्र, कालावधीच्या शेवटच्या सभेत काडीमोड झाल्याने मावळ तालुका अवाक झाला. सध्या नगराध्यक्ष विरुद्ध सगळे असेच चित्र झाले आहे.

मागील निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली. भाजपने नगराध्यक्षपदासह ‘रिपाई’ च्या साथीत सर्वाधिक अकरा जागा जिंकल्या. शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या. चौघे अपक्ष निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शून्यावर राहिली. त्यामुळे सत्तासमीकरणे नेमकी कशी होणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, राजकारणात कोणीही स्पृश्य-अस्पृश्य नसल्याचे अधोरेखित करणारी घटना यावेळी घटना घडली. परस्पर विचार भिन्नता असलेली भाजप व काँग्रेस एकत्र आली. विकासाच्या मुद्यावर एक झालो आहोत, असे मूठ आवळून सांगत नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी सत्ता मिळविली. ही अशी विसंगत जोडी किती दिवस कारभार करणार? याविषयी औत्सुक्य होते. वर्षभरात फाटाफूट होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, पाच वर्षे सुरळीत गेली.

पाच वर्षांच्या संसाराची काडीमोड

एकमेकाला सांभाळत, अंतर्गत कुरबुऱ्या पडद्याआडच ठेवून कारभार चालला. मात्र, सत्ताकाळातील अगदी अंतिम काही दिवसात काडीमोड झाला. याची अनेक कारणे आहेत, त्यातील काही पडद्याआड चाललेल्या ‘कारभारा’ची आहेत. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी संदर्भासह स्पष्टीकरणे मिळतील. मात्र, सध्यातरी नगराध्यक्षा विरुद्ध सगळे असेच चित्र पहावयास मिळत आहे. याचे कारण ठरली सर्वसाधारण सभा. नगराध्यक्षांनी बोलाविलेल्या सर्वसाधारण सभेसह विशेष सभा रद्द केली. ‘सभा ऑफलाइन होती. मात्र, कोविडमुळे ऑनलाइन घेण्याची सूचना आल्याने दोन्ही सभा रद्द झाल्या’, असे सत्ताधारी गटाचे म्हणणे आहे. तर ‘आम्हीच बहिष्कार टाकल्याने सभा रद्द झाल्या’, असा दावा विरोधी गटाने केला आहे. नगरपरिषदेचा कार्यकाळ संपण्याच्या दिवशी ही उलथापालथ झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ‘नगराध्यक्ष या मनमानी कारभार करतात, प्रत्येक कामाचे श्रेय स्वतःच घेतात’, असा आरोप करत भाजपच्या तीन सदस्यांसह काँग्रेस, शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी शेवटच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. तर ‘मी मनमानी करते, श्रेय घेते हे नेमके शेवटच्या दिवशी कसे उमगले?’ असा प्रतिसवाल नगराध्यक्षांचा आहे.

अश्लील मजकुराद्वारे
कुटुंबाची बदनामी
पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी मुलांसाठी २२ केंद्रांवर ११,७५० डोस

सध्याच्या हालचाली राजकीय नांदी

सत्तेत पाच वर्षे नांदणाऱ्या काँग्रेसने भाजपची ऐनवेळी साथ सोडली. यापूर्वी भाजपच्या चार सदस्यांनी विरोधात भूमिका घेतली होती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट जनतेतून पाच वर्षांसाठी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जाधव यांनी अनिर्बंध सत्ता उपभोगली. कामे करता-करता एकाधिकारशाहीमुळे स्वपक्षीयांचा एक गट नाराज झाला. मुळात जाधव यांचा मूळ स्वभाव रोखठोक असल्याने त्याला मुरड घालणे अवघड होते. यामुळे नाराजी वाढली. सध्या घडणाऱ्या राजकीय हालचाली आगामी सत्ता समीकरणांची नांदी ठरणाऱ्या आहेत. नगराध्यक्षांच्या विरोधात गेलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह काँग्रेस नगरसेवक निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के, संजय घोणे, पूजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, आरोही तळेगावकर, अंजना कडू, सेजल परमार, शिवसेनेचे नगरसेवक शिवदास पिल्ले, सुनील इंगुळकर, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, भाजपच्या नगरसेविका अपर्णा बुटाला, गौरी मावकर, जयश्री आहेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांची गाठ घेत खलबते सुरू केली.

'मनी’ प्रभाव

लोणावळ्यातील राजकारण नेहमीच अर्थ केंद्रित राहिलेले आहे. निवडणूक लढविण्यापासून पदे मिळवण्यापर्यंत साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर होत आला आहे. स्वहितासाठी वेळप्रसंगी नैतिकतेला बाजूला सर्वजण एक झाल्याचीही उदाहरणे आहेत. विरोधी बाकावर बसलेल्यांनीही तडजोड केली आहे. शेवटच्या बैठकीपर्यंत अर्थकारण याच विषयावर चर्चा आहे. पर्यटन स्थळ असलेल्या खंडाळ्यातील एका जागेवरील ‘नेचर झोन’ बदलून ''रहिवासी झोन'' करणे, भूसंपादनाचा विषय व जिओ केवल टाकण्याचे कामासह इतर विषय पत्रिकेवर होते. शेवटची बैठक असल्याने या बैठकीत मोठी अर्थपूर्ण ‘गेम’ असे बोलले जात आहे. यातूनच काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांमध्ये बेबनाव निर्माण झाला असल्याची चर्चा झडली आहे. सत्ताधारी गटाचा ऑफलाइन सभा घेण्याचा डाव हाणून पाडत नगरपरिषद प्रशासनाने एक प्रकारे हातभार लावला. तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, अपक्ष नगरसेवकांसह असंतुष्टांनी नगराध्यक्षांविरोधात एकजूट करत महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com