Corona vaccination
Corona vaccinationesakal

पिंपरी : लसीकरणाला आधी नकार; आणि आता गर्दी

ताप येतो, हात-पाय दुखतात, अंग दुखते, थंडी वाजते, यामुळे आम्ही कोरोना प्रतिबंधक लस घेत नाही, अशी वेगवेगळी कारणे नागरिकांकडून सांगितली जात होती.
Summary

ताप येतो, हात-पाय दुखतात, अंग दुखते, थंडी वाजते, यामुळे आम्ही कोरोना प्रतिबंधक लस घेत नाही, अशी वेगवेगळी कारणे नागरिकांकडून सांगितली जात होती.

पिंपरी - ताप येतो, हात-पाय दुखतात, अंग दुखते, थंडी वाजते, यामुळे आम्ही कोरोना प्रतिबंधक लस (Corona preventive vaccine) घेत नाही, अशी वेगवेगळी कारणे नागरिकांकडून (Public) सांगितली जात होती. माझे अमुक-तमुक आजारावर औषधे (Medicine) सुरू असल्याची कारणे अनेकजण सांगत होती. अजूनही अनेक जण तशी कारणे सांगत आहेत. मात्र, त्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण, आता प्रवासासाठी, शासकीय वा निमशासकीय कार्यालयांत जाण्यासाठी लशीचे डोस (Dose) घेतलेले असणे अत्यावश्यक आहे. शिवाय, लशी विषयीचे गैरसमजही दूर झाले आहेत, त्यामुळे लसीकरणाला (Vaccination) चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लसीकरण केंद्रांवरील गर्दीमुळे दिसत आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण अत्यावश्यक केले आहे. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वाहनाने प्रवास करायचा असल्यास लस घेतलेली असणे आवश्यक आहे. सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही लस घेतली आहे किंवा नाही, याची खात्री करूनच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे लस घेण्याला नागरिकांकडून प्राधान्य दिले जात असून, लसीकरण केंद्रांवर गर्दी बघायला मिळत आहे.

शहरात २१६ केंद्र

शहरात २१६ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यात ६९ केंद्र महापालिकेची असून, १४७ केंद्र खासगी आहेत. महापालिकेच्या केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रांवर शुल्क आकारून लस दिली जात आहे. कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लशीचे डोस महापालिका केंद्रांवर उपलब्ध आहेत. खासगी केंद्रांवर या दोन्ही लशींसह स्फूटनिक व्ही लसही दिली जात आहे. शुक्रवारपर्यंत ३१ लाख ४० हजारांवर डोस देण्यात आले आहेत. चार जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे.

पहिला डोस ९५ टक्के

शहरातील बहुतांश नागरिकांनी महापालिकेच्या व खासगी केंद्रांवर लस घेतली आहे. काहींनी शहराबाहेरील केंद्रांवर व शहराबाहेरील काहींनी शहरातील केंद्रांवर लस घेतली आहे. शहराची लोकसंख्या २५ लाख गृहित धरली जात आहे. त्यात १८ वर्षांवरील सुमारे ९५ टक्के नागरिकांनी पहिला व ७५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लशीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने अथवा ३९ आठवडे झालेल्या आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर व ६० वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे.

Corona vaccination
लोणावळा नगरपरिषदेत पाच वर्षांच्या संसाराची काडीमोड

लस न घेण्याची कारणे

- लस घेतल्यानंतर ताप आला, अंग व डोकेदुखीचा त्रास झाल्याचे इतरांनी सांगितल्याने भीती

- दोन डोस घेऊनही काहींना कोरोना संसर्ग झाला, काहींचा मृत्यू झाल्याची कळल्याने अविश्वास

- माझी ॲंजिओग्राफी झाली आहे, मधुमेह, रक्तदाबाची औषधे सुरू असल्याने लस घेण्यास नकार

- मी डोस घेतला आहे, पण, मोबाईल नसल्याने प्रमाणपत्र दाखवू शकत नसल्याची कारणे

आता लस घेतात

लस घेण्याबाबत घरोघरी जात असताना नागरिकांकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात होती. लस घेण्यास नकार दिला जात होता. आता प्रवासासाठी, सरकारी कामासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने व लशीबाबतचे गैरसमज दूर झाल्याने लस घेण्याला प्राधान्य दिले जात आहे, असे लसीकरण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.

तारखेनिहाय लसीकरण

तारीख/ दिलेले डोस

१ / ७,५७०

२ / ८,१२९

३ / ७,०४२

४ / १२,१४८

५ / १२,०५०

६ / ५,१२५

७ / २२,१४३

८ / १८,१४८

९ / २०,४४३

१० / १५,८४७

११ / १७,५३६

१२ / १६,११०

१३ / १,२३१

१४ / .....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com