आळंदीत पोस्ट कामगार संघटनेचे अधिवेशन

आळंदीत पोस्ट कामगार संघटनेचे अधिवेशन

पिंपरी, ता. ९ : नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, पोस्टमन व एमटीएस ग्रुप सी या संघटनेचे द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आळंदी देवाची याठिकाणी जनरल एफएनपीओ सचिव बी. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
कार्यक्रमास न्यू दिल्ली येथील भारतीय टपाल विभागाचे प्रमुख विनीत पांडे (सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट) हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. तसेच अधिवेशनासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून इंटकचे सचिव महेंद्र घरत, इंटक पुणे विभागाचे अध्यक्ष कैलास कदम, पुणे महापालिकेचे सदस्य दत्ता धनकवडे, मनोहर गडेकर तसेच पुणे शहर पूर्व विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर सतीश गोपाराजू, एफएनपीओचे माजी सचिव जनरल डी. त्यागराजन, माजी सचिव जनरल टीएनरहाटे, राष्ट्रीय अध्यक्ष बिदान चौधरी, जनरल सचिव निसार मुजावर, तृतीय श्रेणी संघटनेचे जनरल सचिव शिवाजी वस्सीरेड्डी, आरएमएसचे जनरल सचिव श्री त्यागी, संघटनेचे वरिष्ठ नेते टी. एन. रहाटे, बी एम. घोष, एनयुपीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गुलाब रब्बानी, राज्य सचिव आर. एच. गुप्ता उपस्थित होते.
लॉकडाउन कालावधीमध्ये घरपोच औषधे, मनीऑर्डर, हॉस्पिटलमध्ये लागणारे साहित्य, अत्यावश्यक पत्रे, आधार कार्डद्वारे बँक खात्यातील रक्कम घरपोहोच कामाबाबत पोस्टल विभागामार्फत पोस्टमन बंधूंचे आभार मानले. तसेच एफएनपीओ संघटनेच्या कामगार हिताच्या धोरणाबद्दल विशेष गौरवोद्गार पांडे यांनी काढले. माजी सचिव जनरल टी. एन. रहाटे यांनी पोस्टमन भरतीसंदर्भात नियमावली बदल केल्याचे सांगितले. डी. त्यागराजन माजी सचिव जनरल यांनी बदलत्या तांत्रिक विभागामध्ये सुद्धा पोस्टमन व पोस्ट खात्याच्या महत्त्वाची भूमिका विशद केली. निसार मुजावर यांनी दैनंदिन कामकाज करताना येणाऱ्या आयपीपीबी, नोडल पार्सल बटवडा, नवीन मोबाईल पुरवठा, गणवेश भत्ता वाढविणे या संदर्भातील सर्व समस्या प्रभावीपणे मांडल्या. जनरल सचिव शिवाजी वस्सीरेड्डी यांनी पोस्टमनमधून तृतीय श्रेणीच्या रिक्त जागांवर तात्पुरत्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात यावी तसेच सर्व प्रकारच्या रिक्त जागा भरताना ज्या राज्यांमध्ये जागा भरली जाणार आहे तेथे स्थानिक राज्य भाषा येणे अनिवार्य करण्यात यावे अशी मागणी केली.
अधिवेशनामध्ये अध्यक्षपदी निसार मुजावर (महाराष्ट्र), खजिनदारपदी सोमा घोष (प.बंगाल), तर जगदीश शर्मा (दिल्ली) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे सचिव सुनील झुंझारराव तसेच पुणे रिजनल सेक्रेटरी डी. आर देवकर, अध्यक्ष विनय खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com