Crime News
Crime Newssakal media

थेरगावमध्ये टोळक्याची दहशत; दोघांना अटक, सहा जणांवर गुन्हा

‘मी पिंपरी-चिंचवडचा भाई आहे, तुमच्या मुलाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. तसेच टोळक्याने कोयते हवेत भिरकावून परिसरात दहशत माजवली.
Summary

‘मी पिंपरी-चिंचवडचा भाई आहे, तुमच्या मुलाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. तसेच टोळक्याने कोयते हवेत भिरकावून परिसरात दहशत माजवली.

पिंपरी - ‘मी पिंपरी-चिंचवडचा भाई आहे, तुमच्या मुलाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. तसेच टोळक्याने (Gang) कोयते हवेत भिरकावून परिसरात दहशत (Panic) माजवली. कुटुंबातील सदस्यांना मारहाण (Beating) करून कुंड्यांची तोडफोड (Damage) करून नुकसान (Loss) केले. हा प्रकार थेरगाव येथे घडला. याप्रकरणी श्यामसुंदर श्रीनाथ यादव (रा. तुळजाई कॉलनी, लेन क्रमांक तीन, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम चौधरी व आदित्य चव्हाण यांना वाकड पोलिसांनी अटक केली असून मयूर घोलप, अजय कांबळे, प्रणव शेवाळे, सोन्या साबळे व त्यांच्या सहा मित्रांवर गुन्हा दाखल आहे.

रविवारी (ता. १३) दुपारी तीनच्या सुमारास थेरगावातील तळजाई कॉलनी येथे फिर्यादी हे त्यांच्या घराबाहेर बसले होते. त्यावेळी तीन ते चार दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने कोयते हवेत भिरकावून कॉलनीत दहशत माजवली. फिर्यादी यांचा मुलगा अतुल कोठे राहतो, असे विचारले. त्यावेळी फिर्यादीने त्यांना काय झाले असे विचारले असता मयूर घोलप याने ‘मी पिंपरी-चिंचवडचा भाई आहे, अतुल कोठे आहे, मी त्याला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यात मारण्यासाठी कोयत्याने वार केला. मात्र, फिर्यादीने वार चुकविला व दरवाजावर बसला. दरम्यान, इतर आरोपींनी लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी फिर्यादी यांना मारहाण केली. फिर्यादी यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून घरासमोरील कुंड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

वृक्षतोडप्रकरणी एकावर गुन्हा

विनापरवाना पोलिस ठाण्याच्या आवारातील एक वृक्ष तोडल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार देहूरोड पोलिस ठाणे येथे घडला. सत्तार शेख (रा. देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यातील शिपाई किशोर बोंडे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हा ठाण्याच्या आवारात ड्रेनेज दुरुस्तीचे काम करीत होता. त्यावेळी त्याने विनापरवानगी तेथील पिपरणीचे एक वृक्ष तोडले. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर आरोपीवर भारतीय वन अधिनियम व महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमांतर्गत देहूरोड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Crime News
दापोडीत तृतीयपंथींना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

गांजाप्रकरणी बावधनमध्ये एकाला अटक

बेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई बावधन येथे करण्यात आली. लहानू निवृत्ती केदार (वय ३५, रा. जाधववस्ती, बावधन, मूळ-बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून राजू सोनवणे (रा. खडकवासला) याच्यावर गुन्हा दाखल आहे. आरोपी केदार याने सोनवणे याच्याकडून २६ हजार ३२५ रुपये किमतीचा गांजा विकत आणला. व विक्रीसाठी स्वतः;कडे ठेवला. याबाबत पथकाला माहिती मिळाली असता बावधन येथे कारवाई करून केदार याच्याकडून गांजा व पाचशे रुपयांची रोकड असा एकूण जप्त केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चिखलीत पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावली. ही घटना चिखली येथे घडली. या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांच्या दोन मैत्रिणी रविवारी (ता. १३) रात्री सव्वा दहाच्या सुमारास जेवण करून कचरा टाकण्यासाठी चिखलीतील शरदनगर येथील भाजी मंडई येथे गेल्या होत्या. कचरा टाकून घरी पायी येत असताना दुचाकीवरून दोघेजण फिर्यादी यांच्याजवळ आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com