सोसायटीतील सुविधांसाठी रहिवाशांचे आंदोलन. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोसायटीतील सुविधांसाठी रहिवाशांचे आंदोलन.
सोसायटीतील सुविधांसाठी रहिवाशांचे आंदोलन.

सोसायटीतील सुविधांसाठी रहिवाशांचे आंदोलन.

sakal_logo
By

हिंजवडी, ता. १५ ः आयटी नगरीतील फेज-२ येथील हाय मॉन्ट सोसायटीतील रहिवाशांनी सुविधा मिळत नसल्याच्या विरोधात हातात फलक दर्शवत निदर्शने केली. या इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत असून बांधकाम व्यावसायिकाने अद्याप कामे पूर्ण न केल्याने आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. येथे २०१९ पासून राहत असून मिळकत प्रमाणपत्र मिळून दोन वर्ष होऊन अजून प्राथमिक सुविधा सुद्धा उपलब्ध नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली.


गोकूळ दास ः ‘‘ पाणी, स्वच्छता, पेंटिंग, पार्किंग, सीपेज, चिल्ड्रेन्स प्ले एरिया या सगळ्या सुविधा अजून तयार नाहीत. तसेच सोसायटीच्या आवारात बोअरवेल असताना सुद्धा दोन वर्षापासून घरगुती वापरासाठीचे पाणी टँकरद्वारे विकत घ्यावे लागत आहे.’’

हाय मॉन्ट ‘ए’विंग, अतुल भिंगे ः ‘‘दोन वर्षांपासून बांधकाम व्यावसायिकासोबत वारंवार बैठका घेऊन आमच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही सकारात्मक प्रतिसाद अजूनही मिळाला नाही.’’

हाय मॉन्ट,‘सी’ विंग, प्रदीप गुट्टे ः ‘‘संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या नवीन प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. परंतु, आमच्या इमारतीचे राहिलेले काम करण्यासाठी मात्र दुर्लक्ष केले जात आहे. इमारतीच्या आवारात बांधकामाचे साहित्य पडून असल्याने मलेरियासारखे आजार होण्याची शक्यता आहे. सोसायटीत चारशे कुटुंबे रहायला असून पार्किंगसाठी आम्ही अनेकवेळा पाठपुरावा करूनही आम्हाला अजून हक्काचे कव्हर पार्किंग मिळाले नाही.’’

बिल्डरशी संपर्क होऊ शकला नाही

संबंधित बिल्डर दिलीप मित्तल यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

UPN22B28792

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top