Ganja
GanjaSakal

पिंपरी-चिंचवड शहर परिसराला गांजाची ‘झिंग’

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बाहेरून मोठ्या प्रमाणात गांजा येत असल्याचे मागील काही दिवसातील कारवाईवरून स्पष्ट होते.
Summary

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बाहेरून मोठ्या प्रमाणात गांजा येत असल्याचे मागील काही दिवसातील कारवाईवरून स्पष्ट होते.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बाहेरून मोठ्या प्रमाणात गांजा (Ganja) येत असल्याचे मागील काही दिवसातील कारवाईवरून (Crime) स्पष्ट होते. या गांजाच्या नशेत (Adict) झिंग होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची वाहतूक करणारे हाती लागत असले तरी मुख्य सूत्रधार मात्र मोकाटच असल्याने शहरात गांजा येण्याचे प्रकार सुरूच आहेत.

गांजाची विक्री, साठवणूक व वाहतुकीस पूर्णपणे प्रतिबंध असतानाही शहरात मोठ्या प्रमाणातील साठ्यासह थोड्या प्रमाणातही दरदिवशी गांजा सापडत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिस आयुक्तालयांतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकही स्थापन करण्यात आले. पथकाने शहरातील अंमली पदार्थ व्यापारावर लक्ष केंद्रित केले. मात्र, या पथकाच्या हातीही कधीतरीच मोठा साठा हाती लागतो. नाहीतर पाच ग्रॅम, दहा ग्रॅम गांजा जप्त एवढीच काय ती कारवाई असते. यामध्येही मुख्य सूत्रधार मोकाट राहत असल्याने कारवाई केल्यानंतरही गांजा तस्करी राजरोसपणे सुरूच आहे. शहरातील अनेक भागांत गांजा सहजपणे उपलब्ध होत असल्याने अनेक अल्पवयीन मुलेही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. काही ठिकाणी तर गांजा हब तयार झाले आहे. गांजा विक्रेत्यांची साखळी तोडण्यासह मुख्यसूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मुख्य सूत्रधारापर्यंत कधी पोहोचणार ?

गांजा वाहतूक करणारे हाती लागत असले तरी त्यांचे मुख्य सूत्रधार मोकाटच राहतात. हे रॅकेट चालविणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून कडक कारवाई करण्यात मात्र पोलिसांना यश येत नाही. त्यामुळे शहरात गांजा येतच आहे.

कुठून येतो गांजा

ओरिसासह इतर काही राज्यात जंगलांमध्ये गांजा पिकवला जातो. तेथूनच हा गांजा विक्रीसाठी शहरात येतो. चाकण येथे सापडलेला गांजाही आरोपींनी ओरिसा येथून शहरात आणल्याचे समोर आले.

मागील सहा महिन्यातील गांजाची कारवाई

गुन्हे आरोपी माल किंमत

३३ ६० ६०८ किलो ८७७ ग्रॅम १ कोटी ९२ लाख ४ हजार ४३३

सहा महिन्यातील मोठ्या कारवाया

- हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बाळू महादेव वाघमारे याच्याकडून ३० किलो गांजा जप्त

- हिंजवडीतील राक्षेवस्ती येथे विकास विनोद मोंडळ याच्याकडून ३७ किलो गांजा जप्त

- चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चेतन हरिराजी पुरोहित व त्याच्या साथीदाराकडून ९८ किलो गांजा जप्त

- चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गोकूळ शिवाजी आगे याच्याकडून १९७ किलो गांजा जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com