सामाजिक समतेचा आग्रह धरणे अवघड

सामाजिक समतेचा आग्रह धरणे अवघड

भोसरी, ता. १२ : ब्रिटिश राजवटीत काम करणे अवघड होते. मात्र, तरीही त्यावेळी सामाजिक समतेची तत्त्वे सांगणे, सामाजिक समतेचा आग्रह धरणे आजच्या काळाइतके अवघड नव्हते, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी भोसरीत व्यक्त केले.
भोसरीतील पीएमटी चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीद्वारे महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ३२व्या फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत ‘भारतीय राज्यघटना आणि सद्यःस्थिती’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्‍घाटन माजी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, व्याख्याते प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
या वेळी माजी नगरसेवक वसंत लोंढे, सखाराम डोळस, विजय फुगे, भाऊसाहेब डोळस, दीपक डोळस, दादू डोळस, सुनील गव्हाणे, संदीप राक्षे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल डोळस होते. गायकवाड पुढे म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून, भारताला समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्याची राज्यघटना दिली, हे जगातील एरकमेवादित्य उदाहरण आहे. भारताची लोकशाही ही संविधानावरच टिकून आहे. मात्र, सध्या या संविधानालाच धोका निर्माण झाला आहे. याकडे नागरिकांनी गंभीरपणे पाहिले पाहिजे, कारण घटना ही फक्त एक ग्रंथ नाही, तर या देशाची गेल्या ७५ वर्षाची लोकशाहीची जीवन पद्धती आहे.’’

गावातील एकोपा
सहा वर्षापूर्वी भोसरीतील श्री भैरवनाथ महाराज उत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती एकाच दिवशी आली होती. तेव्हा उत्सव व जयंती समिती आणि ग्रामस्थांनी एकत्र बसून गावाचा उरुस दोन दिवस पुढे घेतला होता. आता बोपखेलमध्येही उरुस आणि जयंती एकाच दिवशी आल्याने ग्रामस्थांनी एकत्र सभा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक दोन दिवस पुढे घेण्याचे ठरविले आहे. यातून भोसरीसह पंचक्रोशीतील गावांमधील एकोप्याचे व्याख्यान मालेत कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com