देहूमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

देहूमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

देहू, ता. १४ : देहूरोड आणि देहू परिसरात विविध संस्थाच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. देहूरोड शहर ब्लॉक कॉग्रेस कमिटीच्यावतीने प्रांतिक सदस्य दीपक सायसर व महिला अध्यक्षा वैशाली जगताप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपाध्यक्ष वेंकटेश कोळी व पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा राणीताई पांडियन यांनी येथील ऐतिहासिक बुद्ध-विहारातील भगवान गौतम बुद्ध मूर्तीस पुष्पहार अर्पण करून वंदना केली. यावेळी मावळ तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष गफूरभाई शेख, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मेहबूब गोलंदाज, मागासवर्गीय अध्यक्ष विल्सन पालीवाल, सांस्कृतिक अध्यक्ष सुनील कंद्रा, मलिक शेख, आसिफ सैयद, परवेज अत्तार, बबन टोपे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देहू येथे नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी नगरपंचायत सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com