पीएमपी वाहकांवर कारवाईची मागणी

पीएमपी वाहकांवर कारवाईची मागणी

किवळे,ता.२५ : किवळे, मनपा भवन मार्गावरील काही बसचे चालक आणि वाहक प्रवाशांसोबत उद्धटपणे वागत आहेत. त्यांच्याकडून काही थांब्यांवर बस न थांबवणे, मागील बसने येण्याचे सल्ले देणे असे प्रकार घडत आहेत. अशा चालक आणि वाहकांवर कारवाईची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

किवळे बस टर्मिनलस् मधून सुटलेल्या बस या रावेत, पुनवळे, ताथवडे, डांगे चौक, औंध, विद्यापीठ आणि शिवाजीनगर, जंगली महाराज रोड मार्गे मनपा भवनला जातात. मार्गातील अनेक थांब्यांवर बस न थांबवणे, चालक-वाहकाचे उद्धट बोलणे असा अनुभव गेल्या काही महिन्यांपासून सर्रास येत असून पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ही बाब गांभीर्याने घेऊन संबंधित चालक आणि वाहकांना समज द्यावी अशी मागणी प्रवाशांनी करत आहेत.
‘‘बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये अनेक वृद्ध नागरिकही असतात, सर्वच प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात, त्यामुळे पीएमपीला उत्पन्न मिळते. त्यामुळे बस चालक आणि वाहकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागणे आणि चांगली सेवा देणे अपेक्षित आहे.’’
- नेहा खान, अर्चना म्हाळसकर सामाजिक कार्यकर्त्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com