Womens Dikshant Sohala
Womens Dikshant Sohalasakal

Womens Dikshant Sohala : तिसाव्या सत्रातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा लोणावळ्यात दिक्षांत सोहळा

महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने महिला वाहन चालक पदाच्या महाराष्ट्रातील पहिल्या तुकडीचा दिक्षांत सोहळा दिमाखात संपन्न झाला.
Summary

महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने महिला वाहन चालक पदाच्या महाराष्ट्रातील पहिल्या तुकडीचा दिक्षांत सोहळा दिमाखात संपन्न झाला.

लोणावळा - महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने महिला वाहन चालक पदाच्या महाराष्ट्रातील पहिल्या तुकडीचा दिक्षांत सोहळा दिमाखात संपन्न झाला. खंडाळा येथील केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या तिसाव्या सत्रातील ९२ महिला पोलिस कर्मचारी लवकरच पोलिस दलात रुजू होणार आहेत. राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर, पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एम. एम. मकानदार, उपप्राचार्य डॉ. अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार दिक्षांत सोहळा संपन्न झाला. श्री. व्हटकर यांनी यावेळी प्रशिक्षणार्थी महिला पोलिस कर्मचाऱ्यांची मानवंदना स्वीकारली.

महाराष्ट्र पोलिस दलात महिला चालक पदासाठी प्रथमच भरती करण्यात आली आहे. १ आॅक्टोबर २०२२ रोजी खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे महिला वाहन चालक म्हणून भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींची महाराष्ट्रातील पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले. दौंड येथील प्रशिक्षण केंद्रात तांत्रिक प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलिस दलात रुजू होणार आहेत. पासिंग आउट परेडनंतर प्रशिक्षणार्थींनी कृतज्ञता व्यक्त करत भावना व्यक्त केल्या. ‘स्वयंस्फूर्ती’ या स्मरणिकेचे यावेळी प्रकाशन झाले. प्राचार्य एम. एम. मकानदार यावेळी म्हणाले, ‘‘देशाची अंतर्गत सुरक्षा व शांतता यामध्ये पोलिस हा घटक नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

Womens Dikshant Sohala
MP Girish Bapat Passes Away: टाटा कंपनीचे ऋण फेडण्याचे काम बापट यांनी केले

जनतेला अविरत सेवा देताना प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उत्तमोत्तम प्रकारे उपयोग कराल’’ अशी अपेक्षा मकानदार यांनी व्यक्त केली. मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास व जबाबदारीचे, शिस्तीचे भान ठेवत वाटचाल करा व पोलिस दलाची शान वाढवा असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी केले.

खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने महिला वाहन चालक महाराष्ट्रातील पहिल्या तुकडीचा दिक्षांत सोहळा दिमाखात संपन्न झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com