बोरघाटात बारा वाहनांचा विचित्र अपघात
सहा प्रवासी जखमी ः वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळित

बोरघाटात बारा वाहनांचा विचित्र अपघात सहा प्रवासी जखमी ः वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळित

लोणावळा, ता. २७ ः मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर बोरघाटात खोपोलीजवळ गुरुवारी (ता. २७) दुपारी बारा वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. त्यात सहा प्रवासी जखमी झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.
अपघातात कुंदा मुकुंद सोनवणे (रा. लाहे, शहापूर, जि. ठाणे), हर्षदा आकाश धानेपकर (रा. कोथरुड, पुणे), कमल सदानंद सोनवणे, सदानंद विठ्ठल भोईर (रा. लापगाव, भिवंडी), इलेयम्मा इशू, मॅथ्थ्यू थाॅमस (रा. हांडेवाडी, पुणे) जखमी झाले आहेत.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिटजवळ तीव्र उतारावर भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे ट्रकने पुढे जाणाऱ्या वाहनास ठोकरले. त्यानंतर बारा वाहने एकमेकांवर आदळली. अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही वाहनांचा चक्काचूर झाला. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. सहा जणांना किरकोळ जखमा झाल्या. काही प्रवाशांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले तर काहींना प्राथमिक उपचार करत सोडून देण्यात आले. अपघाताची माहिती समजताच खोपोली पोलिस, बोरघाट पोलिस मदत केंद्र, आयआरबी कर्मचारी, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू करण्यात आले.

द्रुतगती मार्गावरील
तीव्र उतार धोक्याचा

आडोशी ते फूडमॉल हा पट्टा अपघातांसाठी ‘ब्लॅकस्पॉट’ ठरत असल्याचे चित्र आहे. वाहनांचा अतिवेग, लेन कटिंग आणि मार्गावर वाहनांना आलेला अडथळा हाही तितकाच कारणीभूत ठरला आहे. आडोशी ते फुडमॉल दरम्यानचा पट्टा हा अपघाताचे केंद्र ठरत आहे. द्रूतगतीवरील मुंबई कॉरीडॉरकडील किलोमीटर क्र. ४० ते ३६ या केवळ चार किलोमीटरच्या पट्ट्यात दोन वर्षात पंचवीस बळी गेले आहेत. तीव्र उतार, वळण आणि अवजड वाहने कर्दनकाळ ठरत आहे. सध्या या पट्ट्यात द्रुतगती मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे कधी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
अशी आहेत अपघाताची कारणे
----------------------------
१) सुरक्षेच्या उपायांचा अभाव
२) नादुरुस्त तसेच महामार्गाच्या बाजूला उभी वाहने
३) ब्रेक न लागणे, टायर फुटणे
४) तीव्र उतारावर अनेकदा ब्रेकचा अतिवापर. त्यामुळे ब्रेक लायनर गरम होत ब्रेक फेल होतात.
५) इंधन वाचविण्यासाठी काही वेळा वाहने न्युट्रल करणे
६) वेगामुळे वाहनावर नियंत्रण राखता न येणे.


फोटोओळी ः 02514

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com