बॉम्बच्या अफवेने 
लोणावळ्यात खळबळ

बॉम्बच्या अफवेने लोणावळ्यात खळबळ

लोणावळा, ता. १२ ः लोणावळा स्क्वेअर मॉलमध्ये शुक्रवारी (ता. १२) दुपारी एक बेवारस बॅग सापडल्याने लोणावळा परिसरात खळबळ उडाली. मात्र, पोलिस यंत्रणेच्या सतर्कतेमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास येथील लोणावळा स्क्वेअर मॉलमध्ये बेवारस सुटकेससह संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती कळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारची वेळ असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. पोलिसांसह बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मॉल परिसरातील व्यावसायिक, नागरिकांना सूचना देत परिसर मोकळा केला. दरम्यान, ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात चर्चा सुरु झाली होती. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाच्या साह्याने या बॅगची तपासणी केली. मात्र, पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे मॉक ड्रील केल्याची माहिती कळताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.


छायाचित्रः 0253१

Associated Med02530, LON23B02531, LON23B02532

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com