Lonavala Waterfalls
Lonavala WaterfallsSakal

Lonavala Rain : लोणावळ्यात २४ तासांत २१२ मिलिमीटर पाऊस

लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

लोणावळा - लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून मंगळवारी (ता.१८) सकाळी चोवीस तासांत २१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत पावसाला सरासरी गाठता आली नाही. गेल्यावर्षी आजअखेर दोन हजार ५१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर यंदा मात्र केवळ एक हजार ५२४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. मात्र, पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे.

पर्यटकांचे पसंतीचे व तुलनेत कमी क्षमतेचे भुशी धरण भरले असून, परिसरातील धबधबेही बहरल्याने ओसंडून वाहू लागले आहे. इंद्रायणी नदीच्या पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. शहरासह कुरवंडे, कुसगाव बु., डोंगरगाव, औंढे, औंढोली, कार्ला, वेहेरगाव परिसरात रात्रभर जोरदार पाऊस सुरू आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहे.

जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृत, नियोजनशून्य वाढती बांधकामे, बेकायदा भरावांमुळे ओढे-नाल्यांचे बदललेले प्रवाह यामुळे कुसगाव, कार्ला, मळवली भागातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com