Lonavala Valley Incidence
Lonavala Valley Incidencesakal

Lonavala Valley Incidence : लायन्स पॉइंट येथे दरीत पडून तरुणीचा मृत्यू

पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या लायन्स पॉइंट्स येथील दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीत पडून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला.

लोणावळा : पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या लायन्स पॉइंट्स येथील दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीत पडून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला. साक्षी रमेश होरे (वय २१, मूळ रा. म्हसाडे कान्हूरकर वस्ती, दावडी, खेड, पुणे. सध्या रा. गव्हाणेवस्ती, भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाच्या मदतीने मोठ्या प्रयत्नाने तरुणीचा मृतदेह गुरुवारी (ता. २२) दरीतून वर काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या वर्गात शिकत होती. बुधवारी सायंकाळी ती लोणावळ्याजवळील लायन्स पॉइंट्स येथे फिरायला गेली होती. सायंकाळी सहाच्या दरम्यान ती येथील एका दगडी कड्यावरून खाली पडली. ज्या ठिकाणाहून ती कड्यावरून खाली पडली, त्याठिकाणी कड्याच्या कडेला तिची बॅग व चप्पल आढळून आली. स्थानिक व्यावसायिकांनी याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी शिवदुर्ग पथकाच्या मदतीने साक्षीचा शोध घेतला. रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. गुरुवारी सकाळी लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक निरीक्षक किशोर शेवते यांच्या नेतृत्वाखाली आपत्कालीन पथकातील योगेश उंबरे, ओंकार पडवळ, सुनील गायकवाड, सचिन गायकवाड, योगेश दळवी, महेश मसने, आदित्य पिलाने, सिद्धेश निसाळ आदींसह पोलिस कर्मचारी विजय गाले, सचिन शेलार व सीताराम बोकड यांनी शोध मोहीम हाती घेत सुमारे दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीतून साक्षीचा मृतदेह दरीतून वर काढला.

याप्रकरणी साक्षीचे चुलते विकास किसन होरे (वय ३८, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. साक्षी अपघाताने दरीत पडली की तिने आत्महत्या केली, याबाबत पोलिसांनी साशंकता व्यक्त केली असून, पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com