नांगरगाव शाळेत स्वच्छतागृहाचे लोकार्पण
लोणावळा, ता. २ : नांगरगाव येथील लोणावळा नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक विद्यालयात रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या नव्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. शाळांमध्ये स्वच्छतागृह असणे ही विद्यार्थ्यांची मूलभूत गरज असून, विशेषतः विद्यार्थिनी व महिला शिक्षकांसाठी ही अत्यंत आवश्यक बाब असल्याचे ओळखून रोटरी क्लबने पुढाकार घेत हा उपक्रम राबविला.
या लोकार्पण समारंभास रोटरी क्लबच्या अध्यक्षा विजया कल्याण, नगरसेवक सुभाष डेनकर, मुख्याध्यापिका स्वाती येवले, सुरेश गायकवाड यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य परमेश्वरी दामले, धीरूभाई टेलर, नितीन कल्याण, रवींद्र कुलकर्णी, जयवंत नलोडे, पुंडलिक वानखेडे, नारायण शारवाले, दिलीप पवार आदी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांनी सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन शाळेच्या परिसरात स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृह बांधून दिले. या उपक्रमासाठी मुंबई येथील एका दानशूर व्यक्तीने आर्थिक सहकार्य केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने मोठी सोय झाली आहे. शाळा प्रशासनाने रोटरी क्लब व देणगीदारांचे आभार मानत भविष्यातही अशा उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

