Water Issue : प्रकल्प उशाला आणि कोरड घशाला; चिखलीतील सोसायट्यांची अवस्था, पाण्यासाठी केला २५ कोटी खर्च

चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पालगतच्या पाटीलनगर, बगवस्तीवरील विस्टेरिया हौसिंग सोसायटी व आजूबाजूच्या इतर सोसायट्यांना अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
Water Issue
Water Issuesakal

मोशी : चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पालगतच्या पाटीलनगर, बगवस्तीवरील विस्टेरिया हौसिंग सोसायटी व आजूबाजूच्या इतर सोसायट्यांना अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे दररोज यातील अनेक सोसायट्यांना खासगी टॅंकर मागवावे लागतात.

मागील चार वर्षात या सोसायट्यांनी पाणी विकत घेण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले आहेत. याची सर्व बिले आमच्याकडे आहेत, अस दावा या सोसायट्यांच्यावतीने करण्यात आला.

या सोसायट्यांच्या अगदी समोरच नवीनच कार्यान्वित झालेला चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. मात्र, तरीदेखील या भागातील सोसायट्यांना रोज टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. सोसायटीतून हा प्रकल्प आम्हाला दिसतो.

मात्र, पाण्यासाठी आम्हाला त्याचा फारसा उपयोग होत नाही, ही अस्वस्थ करणारी बाब आहे. ‘प्रकल्प उशाला आणि कोरड घशाला’ अशी आमची अवस्था झाली आहे, अशी खंत सोसायटीच्या सभासदांनी व्यक्त केली आहे.

आमच्या सोसायट्यांचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.चिखली येथील पाटीलनगरमधील बगवस्ती या ठिकाणच्या विस्टेरिया सोसायटी व आजूबाजूच्या सोसायट्यांना मागील एक वर्षापासून अत्यंत कमी पाणीपुरवठा होत आहे.

याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून, त्यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र, याची कोणतीही दखल घेतली गेली नाही.

Water Issue
Nashik Water Shortage : जिल्ह्यातील धरणांत 23 टक्केच जलसाठा; मृग, रोहिणी गेले कोरडे

मागील दहा दिवसांपासून तर या भागात अतिशय कमी पाणीपुरवठा होत आहे. सुमारे पाचशे सदनिका असलेल्या सोसायटीस अपुऱ्या दाबाने फक्त ४ ते ५ हजार लिटर पाणी दिवसाआड मिळत आहे. या भागात पाणी सोडण्यासाठी ठेवलेल्या ठेकेदारांकडून कोणतेही नियोजन न करता पाणी सोडले जाते.

Water Issue
Dhule Water Scarcity : जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा 23.68 टक्के साठा; पाणीटंचाईच्या झळा

चिखलीमधील इतर भागात पुरेसा पाणीपुरवठा केला जातो. फक्त बगवस्तीमधील काही सोसायट्यांनाच खूप कमी प्रमाणत पाणी सोडले जाते. ‘पाण्यासाठी आमच्या सोसायट्यांना चार वर्षात २५ कोटी रुपये लागत असतील तर महापालिकेने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या नावाने आमच्यावर लादलेला कर का भरावा, हेच कळत नाही’, असा प्रश्‍न सोसायटीमधील सदस्यांनी उपस्थित केला आहे.

Water Issue
Water shortage Preparation: गंगापूर धरणात जॅकवेलपर्यंत चर खोदणार! NMCने मागविल्या निविदा

‘‘आठवडाभरात या भागातील सोसायट्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर या भागातील सर्व सोसायटी सदस्यांच्या मार्फत आंदोलन करून सोसायटीच्याशेजारीच असणाऱ्या चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून जाणारे पाणी घेऊ दिले जाणार नाही.

हे पाणी आंदोलन करून बंद केले जाईल तसेच आपल्या निष्क्रिय पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या विरोधातही आंदोलन केले जाईल.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com