खान्देश मित्र मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खान्देश मित्र मंडळाचा
स्नेहमेळावा उत्साहात
खान्देश मित्र मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात

खान्देश मित्र मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १२ ः जुनी सांगवी येथे खान्देश मित्र मंडळाचा तेरावा वर्धापनदिन व कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करून, करण्यात आली. नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांचा मंडळाच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माजी महापौर उषा ढोरे, दिलीप तनपुरे, ज्येष्ठ उद्योजक विजय जगताप, माजी नगरसेवक भाजप चिंचवड विधानसभा प्रमुख शंकर जगताप, शारदा सोनवणे, शशिकांत कदम, हर्षल ढोरे, अतुल शितोळे, शिवाजी पाडूळे, माऊली जगताप, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवकर, राज सोमवंशी, संतोष ढोरे, कृष्णा भंडलकर आदी उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष प्रा. उमेश बोरसे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे सचिव मनोहर पवार यांची दि गव्हर्मेंट सर्व्हंटस महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले. मनोज ठाकूर यांनी आभार मानले.

फोटो
जुनी सांगवी ः खान्देश मित्रमंडळाच्या कौटुंबिक स्नेहमेळाव्यात आमदार अश्विनी जगताप यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
फोटोः 15166