चेंबरची झाकणेही 
आता चोरांना पुरेना

चेंबरची झाकणेही आता चोरांना पुरेना

जुनी सांगवी, ता. २० ः येथील भूमिगत सांडपाणी वाहिन्यांवरील चेंबरच्या झाकणाच्या चोरीचे सत्र सुरूच आहे. शितोळेनगर येथील रस्त्यालगत असलेल्या चेंबरचे लोखंडी झाकण गायब झाल्याने हा चेंबर धोकादायक अवस्थेत उघडा आहे. यामुळे येथे अपघाताचा धोका संभवतो आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून स्थापत्य व संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे.
यापूर्वीही याभागातील अनेक झाकणे चोरीला गेलेली आहेत. त्याठिकाणी महापालिका स्थापत्य विभागाकडून सिमेंटची झाकणे बसविण्यात आली आहेत. गतवर्षी या प्रकाराबाबत तत्कालीन स्थापत्य अभियंत्याने सांगवी पोलिसांत याबाबत तक्रारही दाखल केली होती. चोरीच्या या प्रकाराबाबत पोलिसही कुठे लक्ष देणार? शितोळेनगर मधील चेंबरचे झाकण पुन्हा गायब झाल्याने हे चोरीचे सत्र सुरूच आहे. हे थांबणार कधी? या प्रकारांना आळा बसणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. तर संभाव्य धोका लक्षात घेऊन येथे तत्काळ झाकण बसविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com