तापकीर मळा परिसरात
पथदिवे अद्यापही बंद

तापकीर मळा परिसरात पथदिवे अद्यापही बंद

रहाटणी, ता. २४ : तापकीर मळा चौक ते गोडांबे चौकादरम्यानचे अनेक पथदिवे बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत. ते तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या मार्गावर मोठी वर्दळ असते. वाहनांसह पादचारी मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र, पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर अंधार पसरतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्यावर अंधार असल्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अंधारात चोरांचीही भीती नागरिकांना वाटते. याबाबत नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही, पथदिवे बसवले गेले नाहीत. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लवकरात लवकर पथदिवे सुरू करावेत, अशी नागरिकांची पुन्हा एकदा आग्रहाची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com