जरवरी सोसायटीसमोर 
गतिरोधक बसविण्याची मागणी

जरवरी सोसायटीसमोर गतिरोधक बसविण्याची मागणी

पिंपळे सौदागर, ता. २९ : येथील जरवरी हाउसिंग सोसायटी समोरील रस्त्यावर भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. अपघात रोखण्यासाठी याठिकाणी गतिरोधक तयार करावेत, अशी मागणी उन्नती सोशल फाउंडेशन अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे यांनी केली आहे.
याबाबत भिसे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जरवरी हाउसिंग सोसायटी समोरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता असल्यामुळे वाहणे सुसाट वेगाने धावत असतात. वाहनांना वेग मर्यादा नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नुकत्याच दुचाकीचा अपघात झाल्याने एका महिलेला प्राण गमवावे लागला. तर, दुचाकीची धडक बसून एक युवक गंभीर जखमी झाला.
या मार्गाने पायी चालत जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. विशेषतः सोसायटी समोर पी.के. स्कूल असून त्याठिकाणी शाळेतील मुले रस्ता ओलांडून जात असतात. ज्येष्ठ नागरिक याठिकाणी असलेल्या वाचनालयात येत असतात. या भरधाव वाहनांमुळे त्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत. त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादित राहून संभाव्य अपघाताची संख्या रोखण्यात यश येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com