तरुणांनी शिवरायांचे आदर्श आत्मसात करावेत

तरुणांनी शिवरायांचे आदर्श आत्मसात करावेत

जुनी सांगवी, ता. ३० ः छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच बादशाहीविरोधात संघर्ष करत स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सर्वांना सोबत घेऊन महाराजांनी आदर्श समाज निर्माण केला. आजच्या तरुण पिढीने महाराजांचे आदर्श विचार आत्मसात करून त्यांचे आचरण केले पाहिजे, असे मत अखिल सांगवी शिवजयंती उत्सवात बोलताना शिवव्याख्याते आशुतोष झा यांनी व्यक्त केले.

अखिल समस्त सांगवीकरांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी रक्तदान शिबिराने शिवजयंतीची सुरुवात करण्यात आली. यात ४१ शिवभक्तांनी रक्तदान केले. जनसेवा रक्तपेढी हिंजवडी यांनी शिबिरात योगदान केले. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवरायांचे ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे’ या विषयावर शिवव्याख्याते आशुतोष झा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आशुतोष झा यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाच्या पराक्रमी शौर्याचे प्रसंग अधोरेखित केले.
आशुतोष झा म्हणाले, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चाळीस दिवस अमानुष छळ करण्यात आला. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा त्याग केला नाही. औरंगजेबासमोर झुकले नाहीत. आज भारतात लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर सुरू आहे. मुलींनी आज धर्मनिष्ठ, संस्कारी रहावं. आपल्या राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही. यासाठी शिवचरित्र, भागवतगीता तरुणाईने वाचली पाहिजे. शिवजयंतीनिमित्त येथील अहिल्याबाई होळकर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ सोळा फूट मूर्ती साकारण्यात आली होती. याचबरोबर नयनदिप विद्युत रोषणाई, फायर शो, लेझर शो व साउंड सिस्टीमवर छत्रपती श्री शिवरायांची महाआरती करण्यात आली. शिवजयंती व आरतीसाठी आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, शिवभक्त, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com