

पिंपरी, ता. २६ : ‘‘मराठी नाटकाला सुदैवाने अधिक सजग प्रेक्षक मिळालेला आहे. सिनेमा किंवा टेलिव्हिजन या माध्यमांना प्रेक्षकांचा नेहमीच मोठा प्रतिसाद राहिला. नाटकाचा प्रेक्षक मोजका असला, तरी तो नाटकाशी प्रामाणिक आहे,’’असे मत ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले.
‘सकाळ’तर्फे आयोजित वास्तू प्रदर्शनाला सचिन खेडेकर यांनी शनिवारी (ता.२६) भेट दिली. यावेळी त्यांनी नाटक, सिनेमा, सध्याच्या प्रेक्षकांची कलाक्षेत्राकडून अपेक्षा आदी विषयांवर दिसखुलास गप्पा मारल्या. ‘‘नाटकाचा प्रेक्षक हा पुन्हा-पुन्हा नाटक पाहायला येतो. एखाद्या महिन्यात नाटक पाहिले नाही, तर त्यांना चुकल्याचुकल्या सारखं वाटतं. त्यामुळे या प्रेक्षकांसाठी अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी वाढते,’’ असे खेडेकर म्हणाले.
सचिन खेडेकर हे मोठ्या कालावधीनंतर ‘भूमिका’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर दिसत आहेत. याविषयी ते म्हणाले, ‘‘या नाटकाची कथा ही एका नटाची गोष्ट आहे. या नटाकडे आलेली भूमिका आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात झालेले बदल या कथानकावर हे नाटक आधारित आहे. आपल्याला भूमिका करता येते, पण जगता येते का? हे या नाटकातून मांडण्यात आले आहे. आपल्याला स्वत:कडे थोडसं सजगपणे पाहता आलं पाहिजे, हाच संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.’’
कलाकार मने बदलवू शकतात
‘‘सध्याच्या परिस्थितीत कलाकाराने आपल्या कलेतून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. एखादी कलात्मक आवृत्तीच यावर मलम होऊ शकते. कलाकारांनी नेहमी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणे गरजेचे नाही, मात्र आपल्या कलेतून लोकांची मने नक्की बदलवू शकतात,’’ असा विश्वास खेडेकर यांनी व्यक्त केला.
सिनेमा बनवताना प्रेक्षकांचा विचार आवश्यक
‘‘एखादा सिनेमा बनवताना प्रेक्षकांचादेखील विचार केला पाहिजे. नाहीतर ते केवळ स्वांत सुखाय काम होते. प्रेक्षकांना आवडेल, त्यांना पचनी पडेल असा कल असला पाहिजे. तरच अशा कलाकृतींना लोकाश्रय मिळेल. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रेक्षकाभिमुख काम करतात. प्रेक्षकांना जे पाहायचे आहे ते काम ते करत आहेत. हेच प्रेक्षकसंख्या वाढण्याचे कारण आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवतेय, तो कदाचित प्रेक्षकांना आवडणारा सिनेमा आहे,’’ असे सचिन खेडेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.