महात्मा फुले महाविद्यालयात 
मराठी संवर्धनासाठी उपक्रम

महात्मा फुले महाविद्यालयात मराठी संवर्धनासाठी उपक्रम

पिंपरी, ता. २८ ः रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्यातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. ‘माझी मातृभाषा माझी स्वाक्षरी’ उपक्रमांतर्गत मराठीतील स्वाक्षरीचा उपक्रम घेण्यात आला.
ग्रंथालय विभागाने विविध दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन भरविले होते. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
मराठी विभागातर्फे ‘मराठी गझल : काल, आज आणि उद्या’ या विषयावरील व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी गझलेचा प्रवास या माध्यमातून मांडण्यात आला. मराठी गझलेचे अंतरंग उलगडत काही गझलांचे सादरीकरणही झाले. उपप्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी ‘मला उमजलेली गझल’ याविषयी मत मांडले.
प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे, डॉ. मृणालिनी शेखर, प्रा. शहाजी मोरे, प्रा. अनिकेत खत्री, डॉ. नीलकंठ डहाळे यांचे सहकार्य लाभले. प्रा. संग्राम गोसावी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com