शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी विविध सूचना

शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी विविध सूचना

पिंपरी, ता. ३ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती, विचार प्रबोधन यानिमित्त विविध शिवजयंती उत्सव समिती, तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व महापालिका अधिकारी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक झाली. शहरातील कार्यक्रमांच्या ठिकाणी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, मिरवणूक मार्ग विना अडथळे, शिवाजी महाराजांच्या पुतळा सभोवती रंगरंगोटी, सजावट, रोषणाई आदी कराव्यात अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध, चित्रकला, वकृत्व आणि वेशभूषा स्पर्धाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सूचनांचे स्वागत केले. उपआयुक्त रविकिरण घोडके यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com