विधवा महिलांच्या समस्यांसाठी
 राज ठाकरेंची घेतली भेट

विधवा महिलांच्या समस्यांसाठी राज ठाकरेंची घेतली भेट

पिंपरी, ता. ४ : कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मध्यमवर्गीयांपासून उच्चभ्रू लोकांमधील कर्ते पुरुष मृत्यूमुखी पडले आहेत. अशा कुटुंबातील विधवा महिलांच्या मुलांना शाळा शुल्क तसेच, दवाखान्यांच्या बिलांमध्ये मदत व्हावी. कंपनीमध्ये नोकरभरतीचा विचार करण्यात यावा. करामध्ये सवलत मिळावी तसेच, या महिलांसाठी ओळखपत्राची मागणी मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी राज ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोविडमध्ये विधवा झालेल्या एकल महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपये जाहीर केले आणि पालिकेने २५ हजार रुपये जाहीर केले. महापालिकेकडून २५ हजार रुपयांचा लाभ ६४० महिलांना मिळाला. २ हजार ५०० महिला कोविडमध्ये विधवा झाल्या होत्या. सध्या उर्वरित कुटुंबाची परिस्थिती बिकट आहे. याकरिता, मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी विधवा महिलांची बैठक घेतली. त्यानुषंगाने सर्व अडचणी राज ठाकरे यांच्याकडे मांडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर १६ जानेवारीला राज ठाकरे यांची सीमा बेलापूरकर व रिटा गुप्ता यांनी भेट घेऊन सर्व समस्या मांडल्या. त्यावर, ठाकरे यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या विषयावर पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com